Aryan Khan आणि नवाब मलिकांच्या जावयाला SIT समोर चौकशीसाठी हजर रहावं लागणार?

आचित कुमार आणि अरबाझ मर्चंट यांचे जबाब SIT ने नोंदवले
Aryan Khan आणि नवाब मलिकांच्या जावयाला SIT समोर चौकशीसाठी हजर रहावं लागणार?
फोटो सौजन्य - समीर शानबाग

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन आणि मंत्री नवाब मलिकांचा जावई समीर खान यांना NCB च्या SIT समोर चौकशीसाठी हजर रहावं लागण्याची शक्यता आहे. NCB ने स्थापन केलेल्या SIT मध्ये IPS अधिकारी संजय कुमार सिंग यांच्या समितीने जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे.

मुंबई NCB शी संबंधित सहा प्रकरणांमध्ये या SIT ने जबाब नोंदवायला सुरुवात केली आहे. आम्ही या प्रकरणांमध्ये आमच्या तपासाला सुरुवात केली आहे अशी माहिती संजय कुमार सिंग यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

NCB च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, SIT चे अधिकारी मुंबईत असल्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीला वेग येऊ शकतो. फक्त आर्यन खानच नाही तर या सहा प्रकरणांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या सर्वांना SIT समोर चौकशीसाठी हजर रहावं लागू शकतं अशी माहिती NCB च्या अधिकाऱ्याने दिली आहे.

आज SIT ने NCB ने अटक केलेल्या आचित कुमार आणि अरबाझ मर्चंट यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. समीर वानखेडे यांच्या टीमने २ ऑक्टोबर रोजी क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात केलेल्या कारवाईत या दोघांनाही अटक करण्यात आली होती. यानंतर कोर्टाने दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.

Aryan Khan आणि नवाब मलिकांच्या जावयाला SIT समोर चौकशीसाठी हजर रहावं लागणार?
Aryan Khan ला ड्रग्ज पार्टी प्रकरणात गोवण्यात आलंय, साक्षीदार विजय पगारेचा धक्कादायक खुलासा

आर्यन खानलाही मुंबई हायकोर्टाने जामीन मंजूर केला असून, जामीनात घालून दिलेल्या अटीनुसार आर्यनला प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत NCB ऑफिसमध्ये हजर रहावं लागणार आहे. याचसोबत आर्यन खानला आपला पासपोर्ट सरेंडर करावा लागणार असून तो देश सोडून जाऊ शकणार नाहीये. नवाब मलिकांच्या जावयालाही NCB ने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.

Aryan Khan आणि नवाब मलिकांच्या जावयाला SIT समोर चौकशीसाठी हजर रहावं लागणार?
आर्यन खानचं अपहरण करून 25 कोटींच्या खंडणीचा मोहीत कंबोजचा खेळ एका सेल्फीने बिघडवला-नवाब मलिक

आर्यन खानप्रकरणासह आणखी पाच प्रकरणांध्ये समीर वानखेडे यांच्या चौकशीचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. संजय सिंग यांच्या जोडीला १४ तपास अधिकारी देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in