Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा  Aryan Khan ने ड्रग्सचं सेवन केलं होतं: NCB
Aryan khan arres drugs involvement of consumption

Cruise Drugs Party: Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan ने ड्रग्सचं सेवन केलं होतं: NCB

Aryan khan arres drugs involvement of consumption: आर्यन खान याने ड्रग्सचं सेवन केलं होतं या आरोपाखाली त्याला NCB ने अटक केली आहे.

मुंबई: मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे शाहरुख खान मुलगा आर्यन खान याने ड्रग्सचं सेवन केलं होतं. याबाबतचा उल्लेख एनसीबीने जारी केलेल्या अटकेच्या मेमोमध्ये करण्यात आला आहे. यासह इतरही वेगळ्या गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

NCB चे अधिक्षक विश्व विजय सिंग यांनी आर्यन खान याला अटकेचं मेमो बजावलं आहे. ज्यामध्ये आर्यनवर ड्रग्ज बाळगणे, त्याचं सेवन करणे तसेच इतर गुन्हे लावण्यात आले आहे. NDPS Act, 1985 अंतर्गत 3 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता आर्यनला अटक करण्यात आली. सेक्शन 20(b), 27, 35 NDPS Act अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आर्यन खानला एनसीबीकडून बजावण्यात आलेला अरेस्ट मेमो
आर्यन खानला एनसीबीकडून बजावण्यात आलेला अरेस्ट मेमो

दरम्यान, NCB ने या प्रकरणात 13 ग्राम कोकेन, 5 ग्राम MD, 21 ग्राम चरस आणि MDMA च्या 22 गोळ्या जप्त केल्यात. याशिवाय 1 लाख 33 हजार रुपयेसुद्धा जप्त करण्यात आले आहेत.

कॉर्डेलिया क्रूझच्या जहाजावर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर एनसीबीने अतिशय हुशारीने छापा मारला होता. NCB अधिकाऱ्यांनी केलेल्या छापेमारीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आलं होतं.

त्यानंतर अनेक तास चौकशी सुरु होती. अखेर दुपारी 2 वाजता आर्यनसह तीन जणांना अटक करण्यात आली होती. आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि दिल्लीतील फॅशन डिझायनर मुनमुन धमेचा या तिघांना एनसीबीकडून आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

पाहा एनसीबी कार्यालयात नेमकं काय घडलं?

एनसीबीने ज्या तीन लोकांना अटक करण्यात आली आहे त्यात आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा समावेश आहे. तर आज पूर्ण दिवसक नुपूर सारिका, इस्मित सिंह, मोहक जायसवाल, विक्रांत छोकर आणि गोमित चोप्रा यांची सतत चौकशी करण्यात येत होती.

आर्यन म्हणतो मी तर फक्त 'गेस्ट' म्हणून पार्टीत गेलो होतो

आर्यनने एनसीबीच्या चौकशीत असं म्हटलं आहे की, तो पार्टीमध्ये एक गेस्ट म्हणून गेला होता. आर्यनने एनसीबीला असंही सांगितलं आहे की, पार्टीत सामील होण्यासाठी त्याच्याकडून कोणत्याही प्रकारे पैसे घेण्यात आले नव्हते. त्याने असा दावा केला आहे की, पार्टीच्या आयोजकांनी त्याच्या नावाचा वापर करुन पार्टी आयोजित केली. मात्र, असं असलं तरीही आता आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे.

या क्रूझ पार्टीमध्ये दिल्लीतील तीन मुली देखील होत्या. ज्यांना आज (3 ऑक्टोबर) दिल्लीतून ताब्यात घेण्यात आलं आहे. या तिघीही बड्या उद्योजकांच्या मुली आहेत. दरम्यान, याप्रकरणी एनसीबीने सर्वांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. ज्याची तपासणी देखील केली जात आहे.

Aryan khan arres drugs involvement of consumption
Cruise Drugs Party: आर्यन खान असलेल्या 'त्या' ड्रग्स पार्टीच्या छाप्याची Inside Story

NCB अधिकारी प्रवासी म्हणून गेले होते क्रूझवर

एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, टीमचे 22 अधिकारी साध्या कपड्यांमध्ये प्रवासी म्हणून क्रूझवर गेले होते. जहाजात सुमारे 1800 प्रवासी होते जेथे ड्रग्ज पार्टी करणार्‍या 8 लोकांना पकडण्यात आले. छापा टाकल्यानंतर, सर्व लोकांना मुंबई एनसीबी कार्यालयात आणण्यात आले. जेथे याप्रकरणी त्यांची चौकशी केली जात आहे. असे सांगितले जात आहे की, बॉलिवूड, फॅशन आणि उद्योग जगतातील संबंधित हाय प्रोफाइल लोक या पार्टीत जमले होते.

Related Stories

No stories found.