Drugs Case: आर्यन खान पुढचे 5 दिवस तुरुंगातच, आजही नाही मिळाला जामीन!
aryan khan bail hearing court mumbai cruise drug bust rave party shah rukh khan son ncb(फाइल फोटो)

Drugs Case: आर्यन खान पुढचे 5 दिवस तुरुंगातच, आजही नाही मिळाला जामीन!

Aryan Khan Bail Hearing Drugs Case: आर्यन खान याच्या जामीन अर्जावर सुनावणी असून आज याबाबत नेमका निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई: क्रूझ ड्रग्स केसप्रकरणी सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज (14 ऑक्टोबर) मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. कोर्टाने एनसीबी आणि आर्यन खान यांच्या वकिलांनी आपआपली बाजू मांडली. ज्यानंतर कोर्टाने याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला आहे. यावेळी कोर्टाने स्पष्ट केलं आहे की, याबाबतचा निर्णय 20 ऑक्टोबरला सुनावला जाणार आहे.

बुधवारी (13 ऑक्टोबर) मुंबईच्या सत्र न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती. त्यावेळी युक्तिवाद पूर्ण होऊ न शकल्याने कोर्टाने याबाबतची सुनावणी आज घेतली होती. आज देखील अनेक तास दोन्ही बाजून जोरदार युक्तीवाद सुरु होता. अखेर कोर्टाने याबाबतचा निर्णय राखून ठेवला. पण यामुळे आणखी पाच दिवस तुरुंगातच राहावं लागणार आहे.

आर्यन खानला आजही जामीन नाहीच!

शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्स केस प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोर्टात सुनावणी सुरु होती. ज्यानंतर न्यायमूर्ती व्हीव्ही पाटील यांनी आपला निर्णय राखून ठेवला आहे. या प्रकरणी आपण निर्णय 20 तारखेपर्यंत देण्याचा प्रयत्न करुन असं न्यायमूर्तींनी सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमका काय निकाल असणार हे 20 ऑक्टोबरलाच समजू शकेल.

दरम्यान, 20 तारखेलाच हा निर्णय सुनावलं जाईल असं अजिबात नाही. कारण की, न्यायमूर्ती व्हीव्ही पाटील यांनी असं म्हटलं आहे की, ते 20 ऑक्टोबरला बरेच व्यस्त असणार आहे. पण तरीही या प्रकरणी निर्णय देण्याचा प्रयत्न असेल.

आर्यनच्या वकिलांनी कोर्टात काय युक्तिवाद केला?

आर्यन खानच्या वकिलांनी कोर्टात असं म्हटलं की, 'आजच्या जनरेशनच्या मुलांची भाषा, इंग्रजी बरीच वेगळी आहे. त्यामुळे त्यांचे व्हॉट्सअॅप चॅट्स हे एनसीबीला संशयास्पद वाटू शकता. तुम्हाला वाटतं की, हा मुलगा इंटरनॅशनल डॅग ट्रॅफिकिंगमध्ये सहभागी असेल? एजन्सचीचं म्हणणं आहे की, ते MEA च्या संपर्कात आहे. पण आम्ही काय म्हणतो की, आपण करा ना चौकशी, पण हे आरोप अतिशय खोटे आहेत.'

आर्यन खानच्या जामिनावरील सुनावणीसंबंधी LIVE UPDATE:

  • आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निर्णय 20 ऑक्टोबरला (बुधवार) निर्णय सुनावला जाणार.

  • आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी संपली, कोर्टाने निर्णय राखून ठेवला.

  • कोर्टाने लंच ब्रेक घेतला आहे. लंच ब्रेकनंतर पुन्हा सुनावणी सुरु होईल.

  • 'कोर्टात एनसीबीच्या वतीने युक्तिवाद केला जात आहे. NCB कडून असे सांगण्यात आले आहे की, ठोस पुराव्यांच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली आहे. ड्रग्स रॅकेटचे परदेशी संबंध तपासले पाहिजेत. याआधीही आरोपी ड्रग्स घेत होते. दोघांचे व्हॉट्सअॅप चॅट तपासल्यास. क्रूझमधून जे ड्रग्स सापडले आहेत ते केवळ अरबाज मर्चंटसाठी नव्हते. आर्यन खान देखील त्याचे सेवन करणार होता. जर हे क्रूझ भर समुद्रात गेले असते तर क्रूझवरची पार्टी सुरू झाली असती आणि सर्व आरोपींनी ड्रग्सचे सेवन केले असते.' असा युक्तीवाद एनसीबीच्या वकिलांनी केला आहे.

  • सरकारी वकीलांना न्यायालयात पोहोचण्यास झाला उशीर. कोर्टात पोहचल्यानंतर वकिलांनी कोर्टाची माफी मागितली.

  • शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि बॉडिगार्ड रवी आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी सत्र न्यायालयात पोहोचले आहेत.

...तर आर्यन खानला आणखी 5 दिवस तुरुंगात राहावं लागेल

मिळालेल्या माहितीनुसार, जर आर्यन खानला आज जामीन मिळाला नाही, तर त्याला पुढील 5 दिवस तुरुंगातून बाहेर पडणं कठीण होईल. कारण पुढील तीन दिवस कोर्टाला सुट्टी असणार आहे. त्यानंतर सोमवारी पुन्हा जामीन अर्जावर सुनावणी होईल. ज्यानंतर पुन्हा नव्याने प्रक्रिया सुरु होईल. ज्यामुळे आर्यन खानला किमान पुढचे 5 दिवस तुरुंगातच राहावं लागू शकतं.

सतीश मानशिंदेचे ज्युनिअर सहकारी आणि शाहरुख खानचे प्रतिनिधीत्व करणारी लीगल टीम देखील कोर्टात उपस्थित आहे. दरम्यान, NCB च्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग हे कोर्टात बाजू मांडणार आहेत.

aryan khan bail hearing court mumbai cruise drug bust rave party shah rukh khan son ncb
Drug Case: आर्यन खानचा आजचा मुक्कामही ऑर्थर रोड तुरुंगातच, कोर्टात नेमकं काय झालं?

कोर्टात काल काय घडलं होतं?

काल (13 ऑक्टोबर) विशेष सत्र न्यायालयात आर्यनला जामीन अर्ज मंजूर होऊ शकतो शकतो असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु कोर्टात सुनावणी पूर्ण होऊ न शकल्याने जामीन अर्जावर कोणताच निर्णय झाला नाही. सत्र न्यायालयात सुनावणी ही बराच वेळ सुरु होती. त्यामुळे कोर्टाने याबाबत काहीही निर्णय दिला नाही.

कोर्टात आर्यनचे वकील आणि एनसीबी यांच्यात बऱ्याच वेळ युक्तिवाद सुरु होता. आर्यनने ड्रग्सचं सेवन केलं नव्हतं. त्याच्याकडे ड्रग्सही सापडले नव्हते असा युक्तिवाद आर्यनच्या वकिलांकडून करण्यात आला होता.

दुसरीकडे एनसीबीच्या वकिलांनी कोर्टाला असं सांगितलं की, या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटशी संबंध आहे. त्यामुळे आरोपींची चौकशी करणं गरजेचं आहे. तसंच जर हे आरोपी जामिनावर बाहेर पडले तर त्याचा परिणाम संपूर्ण केसवर होऊ शकतो.

दरम्यान, काल हा युक्तिवाद पूर्ण न होऊ शकल्याने कोर्टाने त्यांना आज पुन्हा सुनावणी घेण्यात येईल असं सांगितलं होतं.

Related Stories

No stories found.