Aryan Khan Bail Live Updates: एकीकडे कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी, दुसरीकडे आर्यनची तुरुंगात रवानगी

Aryan Khan Bail Live Updates: ड्रग्स केस प्रकरणी आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु आहे. याच सुनावणीनंतर स्पष्ट होईल की, आर्यन खान हा बाहेर येणार की नाही.
Aryan Khan Bail Live Updates: एकीकडे कोर्टात जामीन अर्जावर सुनावणी, दुसरीकडे आर्यनची तुरुंगात रवानगी
aryan khan bail hearing latest updates mumbai cruise drug case ncb shah rukh khan son(फाइल फोटो)

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला जामीन मिळणार की नाही याबाबतच निर्णय थोड्याच वेळात होणार आहे. आर्यन खान हा मागील 7 दिवसांपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. मुंबईहून गोव्याला क्रूझ जहाजावर धावणाऱ्या ड्रग्स पार्टीचा भाग असल्याने त्याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ताब्यात घेतले होते. याच प्रकरणी आता न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर मुंबईतील किला कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. दुसरीकडे आर्यनसह सर्व आरोपींना एनसीबीने आर्थर रोड तुरुंगात धाडलं आहे.

अशा परिस्थितीत आर्यनला जामीन मिळणार की त्याला तुरुंगात पाठवलं जाणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. पाहा याच या प्रकरणाशी संबंधित लाइव्ह अपडेट:

LIVE UPDATE

  • एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी असताना दुसरीकडे आर्यन खानसह सर्व आरोपींना NCB ने आर्थर रोड जेलमध्ये पाठवलं आहे.

  • आर्यन खानवर कलम 8 हे चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलं आहे. कारण की, आर्यनकडे कोणताही प्रकारचे ड्रग्स सापडलेले नाहीत, आर्यनचे वकील सतिश मानेशिंदे यांचा कोर्टात युक्तीवाद

  • जामीन मिळाल्यास इथून आर्यनची सुटका केली जाईल. जर जामीन मंजूर झाला नाही तर आर्यनला याच तुरुंगात राहावं लागणार आहे.

  • न्यायालयीन कोठडी असल्याने एनसीबीने सर्व आरोपींना मुंबईत आर्थर रोड तुरुंगात पाठवलं आहे.

  • हे कोर्ट सुनावणी घेऊ शकतं की नाही ते माझ्यावर सोडा. जामीन दिला गेला पाहिजे की नाही याबाबत तुमचा युक्तीवाद सुरु करा, न्यायधीशांनी NCB ला वकिलांना सुनावलं.

  • हे कोर्ट आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी घेऊ शकत नाही, NCB च्या वकिलांचा कोर्टात दावा

  • न्यायालयात आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरु

नुपूरचा जामीन अर्ज दाखल

आरोपी नुपूर हिचा जामीन अर्ज तिच्या वकिलांनी सत्र न्यायालयात दाखल केला आहे. ड्रग्स प्रकरणी एनसीबीने नुपूरला अटक केली होती.

न्यायालयीन सुनावणी 12.30 वाजता होईल

आर्यन खान आणि इतर 8 आरोपींच्या जामिनाची सुनावणी आज दुपारी 12.30 वाजता सुरु झाली आहे. ही सुनावणी Esplanade Magistrate न्यायालयात होणार आहे.

जामीन न मिळाल्यास आर्यनला तुरुंगात करावा लागणार मुक्काम

एनसीबीचे अधिकारी हे सुनावणीनंतर न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहतील. जर कोर्टाने आर्यन खान आणि इतर 8 आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्यास त्यांना आर्थर रोड जेलमध्ये नेले जाईल. त्याचबरोबर महिलांना भायखळा कारागृहात नेले जाईल. सर्व आरोपींची कोरोना चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली आहे.

aryan khan bail hearing latest updates mumbai cruise drug case ncb shah rukh khan son
Mumbai Drugs Case: आर्यनला ड्रग्स प्रकरणात अडकवलं गेलं? 'त्या' दोघांमुळे विचारला जातोय प्रश्न

फराह खानची आर्यनसाठी प्रार्थना

नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक फराह खान हिने आर्यन खानच्या सुटकेसाठी प्रार्थना केली आहे. आज आर्यनची आई गौरी खानचा वाढदिवस आहे. अशा परिस्थितीत, त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना, फराहने प्रार्थना केली आहे की आर्यन सुटल्यानंतर लवकरच घरी यावे. गौरीला तिच्या वाढदिवसाची ही सर्वोत्तम भेट असेल.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in