Aryan Khan Bail : शाहरुखच्या मुलाला जामीन मिळाल्यानंतर लीगल टीम म्हणाली सत्यमेव जयते

Aryan Khan Bail : शाहरुखच्या मुलाला जामीन मिळाल्यानंतर लीगल टीम म्हणाली सत्यमेव जयते

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बॉम्बे हायकोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे. यासंदर्भातला सविस्तर आदेश शुक्रवारी येणार आहे. त्यामुळे आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच जाणार आहे. मात्र आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर लीगल टीमने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आर्यन खान, अरबाझ मर्चंट, मुनमुन धमेचा या तिघांनाही जामीन मिळाला आहे. कोर्टाच्या आदेशाची कॉपी मिळाल्यानंतर आर्यन, अरबाझ आणि मुनमुन या तिघांनाही तुरुंगाबाहेर येता येणार आहे.

आर्यन खानच्या वकिलांनी तीन वेळा प्रयत्न केल्यानंतर आर्यन खानला जामीन मिळू शकला आहे. त्यानंतर सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबरला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने ड्रग्ज घेतल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही. तर त्याने कुठलाही कट रचला नव्हता. जस्टिस नितीन सांब्रे यांचे आम्ही आभार मानतो. त्यांनी आमची प्रार्थना ऐकली आणि आर्यनला बेल मंजूर केला. सत्यमेव जयते असं म्हणत लीगल टीमने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आर्यन खान
आर्यन खानफोटो-आज तक

बॉम्बे हायकोर्टाने काही शर्थींसह आर्यन खानला जामीन मंजूर केला आहे. आर्यनला त्याचा पासपोर्ट कोर्टात जमा करावा लागणार आहे. कोर्टाची संमती मिळाल्याशिवाय आणि एनसीबीला सांगितल्याशिवाय आर्यन खानला देश सोडता येणार नाही. एवढंच नाही या प्रकरणातल्या कुठल्याही आरोपीच्या संपर्कात आर्यनला राहता येणार नाही. कोर्टात सुरू असलेल्या कुठल्याही प्रकरणांवर आर्यनला मत देता येणार नाही या अटी कोर्टाने घातल्या आहेत असं आज तकने त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अडल्यानंतर त्याला तुरुंगात जावं लागलं. त्यामुळे मन्नतवर गौरी खानचा वाढदिवस, गौरी आणि शाहरुख यांच्या लग्नाचा वाढदिवस या कोणत्याही फॅमिली फंक्शनमध्ये आर्यन खानला सहभागी होता आलं नाही. आता शाहरुखच्या बर्थ डेच्या दिवशी म्हणजेच 2 नोव्हेंबरला आर्यन मन्नतवर असणार आहे.

बॉम्बे हायकोर्टाने आर्यन खानच्या जामिनाचा निर्णय़ दिल्यावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यानंतर विविध सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली. आर. माधवनने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की आज एका वडिलांना आपल्या मुलाबाबत काय वाटत असेल मी समजू शकतो, असं त्याने म्हटलं आहे.

सोनू सुदनेही ट्विट केलं आहे की देवाचे खूप खूप आभार आहेत की आर्यनला जामीन मिळाला. टीव्ही स्टार आमिर अली यानेही स्टार किड आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर देवाचे आभार मानले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in