'Aryan Khan ड्रग्ज प्रकरण फडतूस विषय, शाहरुख-आर्यन माझं काही वाकडं करु शकत नाहीत'

'Aryan Khan ड्रग्ज प्रकरण फडतूस विषय, शाहरुख-आर्यन माझं काही वाकडं करु शकत नाहीत'

गोळी लागून बॉर्डरवर मरणारा तरुण हा माझ्यासाठी खरा हिरो - विक्रम गोखले

ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB ने शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला केलेली अटक आणि त्यानंतर NCB विरुद्ध नवाब मलिक हा रंगलेला सामना संपूर्ण राज्याने अनुभवला आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी पुण्यात एका कार्यक्रमात या विषयावर आपलं मत मांडलं आहे.

प्रसारमाध्यमांनी विक्रम गोखले यांना आर्यन खान प्रकरणावर प्रतिक्रीया विचारली असता, आर्यन खान ड्रग्ज प्रकरण हा फडतूस विषय असल्याचं विक्रम गोखले म्हणाले. "माझ्यासाठी २१ वर्षांचा तरुण जो बॉर्डरवर गोळी लागून मरतो तो खरा हिरो आहे, आर्यन खान नाही. शाहरुख आणि आर्यन माझं काहीही वाकडं करु शकत नाही", असंही गोखले यांनी सुनावलं.

२ ऑक्टोबर रोजी मुंबईतल्या NCB च्या पथकाने गोव्याला जाणाऱ्या एका क्रुझवर छापेमारी करत अमली पदार्थ हस्तगत केले होते. यावेळी कारवाईदरम्यान NCB ने ८ आरोपींना अटक केली ज्यात शाहरुखचा मुलगा आर्यन याचाही समावेश होता. यानंतर तब्बल २० दिवसांपेक्षा जास्त काळ चाललेल्या कोर्ट-कचेरीतील प्रकरणानंतर हायकोर्टाने आर्यन खानला जामीन मंजूर केला होता.

'Aryan Khan ड्रग्ज प्रकरण फडतूस विषय, शाहरुख-आर्यन माझं काही वाकडं करु शकत नाहीत'
Vikram Gokhale : विक्रम गोखलेंना काय झालंय...? कंगना रनौतचं केलं समर्थन

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in