Exclusive : सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, आर्यन खान तुरुंगात झालाय डिस्टर्ब

जाणून घ्या जेल सूत्रांनी आर्यन खानबाबत मुंबई तकला नेमकी काय माहिती दिली आहे?
Exclusive : सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, आर्यन खान तुरुंगात झालाय डिस्टर्ब
Aryan Khan is distributed inside the Arthur Road Jail

2 ऑक्टोबरला अभिनेता आर्यन खानला अटक करण्यात आली. ड्रग्ज पार्टी आणि क्रूझ पार्टीवर NCB ने छापा टाकला आणि त्यात आर्यन खानला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्या जामीन अर्जावर आता 20 तारखेला सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातला कोठडीतला मुक्काम वाढला आहे. या ठिकाणी आर्यनची अवस्था सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी आहे.

आर्थर रोड तुरुंगातल्या काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खान हा कोठडीत डिस्टर्ब झाला आहे. तो बऱ्याचदा तणावाखाली आहे असंच दिसून येतं असंही काही सूत्रांनी सांगितलं आहे. त्याला तुरुंगातल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला थोडा वेळ लागतो आहे असंही काही अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

mumbai cruise drug bust case Aryan khan joins conspiracy even drugs not seized ncb responds court
mumbai cruise drug bust case Aryan khan joins conspiracy even drugs not seized ncb responds court(फाइल फोटो)

महत्त्वाची बाब ही आहे की सुरक्षेच्या करणास्तव आर्यन खानला क्रूझ प्रकरणातल्या इतर आरोपींपासून वेगळं करून दुसऱ्या बराकीत ठेवण्यात आलं होतं. क्रूझ प्रकरणात अटक झालेले कुठलेही आरोपी सोबत नव्हते. त्यांना सगळ्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याने असा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यांना नेहमीच्या बराकीत ठेवण्यात आलं आहे. या सगळ्यांची RTPCR चाचणी झाली जी निगेटिव्ह आली आहे.

आज आर्यन खान आणि इतर सगळ्या आरोपींना नेहमीच्या बराकीत आणण्यात आलं आहे. त्यांचा क्वारंटाईनचा काळ काल संपला आहे. सोमवारी जेव्हा आर्यन खानला तुरूंगात धाडण्यात आलं तेव्हाच त्याच्या नावावर पैसे जमा करण्यात आले आहेत. आर्य़न खान तुरूंगातल्या कँटीनमधून जे काही घेतो आहे त्याचे पैसे या जमा करण्यात आलेल्या पैशांतून वळते करण्यात येत आहेत.

आर्यन खान
आर्यन खान (फाइल फोटो)

तुरूंगातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानला तुरुंगातलं जेवणही आवडत नाही. पण त्याला ते जेवण घेण्याशिवाय पर्याय नाही कारण कुठल्याही प्रकारचं बाहेरचं अन्न तुरुंगात आणण्यास मनाई आहे. त्याला घरून जे कपडे पाठवण्यात आले आहेत तेच तो वापरतो आहे. त्याला सध्या कैद्याचे कपडे घालण्यास दिलेले नाहीत.

अशी आहे जेलमधली दिनचर्या

१) जेलमधले अधिकारी सकाळी ६ वाजता सर्व कैद्यांना उठवतील.

२) सकाळी सात वाजेपर्यंत सर्वांना नाश्ता मिळेल, ज्यात शिरा-पोहे असतील.

३) सकाळी ११ वाजेपर्यंत जेवणं दिलं जाईल. दोन्ही वेळच्या जेवणात पोळी-भाजी आणि डाळ-भात हेच खाणं मिळेल.

४) दुपारचं जेवण झाल्यानंतर कैद्यांना बराकबाहेर फिरण्याची मुभा दिली जाते. परंतू आर्यन आणि इतर आरोपींना ५ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण होईपर्यंत बाहेर येता येणार नाही.

५) जर आर्यन खान आणि इतरांना अधिकचं खाणं हवं असेल तर त्यांना ते जेलच्या कँटीनमधून विकत घ्यावं लागेल. त्यासाठीचे पैसे हे मनी ऑर्डरने मागवता येतील.

६) संध्याकाळचं जेवण हे ६ वाजेपर्यंत दिलं जाईल, अनेक कैदी हे जेवण रात्री ८ वाजता जेवतात.

Related Stories

No stories found.