'जामिनातील 'ही' अट शिथील करा!' आर्यन खानची बॉम्बे हायकोर्टात विनंती याचिका
आर्यन खान फोटो-आज तक

'जामिनातील 'ही' अट शिथील करा!' आर्यन खानची बॉम्बे हायकोर्टात विनंती याचिका

जाणून घ्या काय म्हटलं आहे आर्यन खानने याचिकेत?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला 2 ऑक्टोबरला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. कॉर्डिलिया क्रूझवर एनसीबीने छापा मारून ही कारवाई केली होती. त्यानंतर त्याला 26 दिवसांनी म्हणजेच 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर झाला. सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आर्यन खान 30 ऑक्टोबरला तुरुंगाबाहेर आला. त्याला काही अटी शर्थींवर हा जामीन मंजूर करण्यात आला होता. आता आर्यन खानने आपल्या वकिलांच्या मार्फत अर्ज करत या शर्थींपासून दिलासा मागिताला आहे.

देसाई देसाई करीमजी या लॉ फर्मतर्फे आणि मुल्ला यांच्यातर्फे आर्यन खानने हा विनंती अर्ज कोर्टात सादर केला आहे. या अर्जात एनसीबीने दर शुक्रवारी कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथील करण्याची मागणी आर्यन खानने केली आहे.

आर्यन खान
आर्यन खान प्रकरणाला नवा ट्विस्ट देणारी व्हायरल ऑडिओ क्लिप

मी जेव्हा एनसीबी कार्यालयात जातो तेव्हा तिथे मीडियाची गर्दी असते. त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागते. या ठिकाणी प्रसारमाध्यमं मोठ्या प्रमाणात हजर राहतात त्यामुळे पोलीस अरेरावी करतात असाही दावा आर्यन खानने केला आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला एनसीबी कार्यालयात हजर राहण्याची जी अट आहे ती शिथील करावी असं आर्यन खानने म्हटलं आहे.

आर्यन खान
आर्यन खान (फाइल फोटो)

ड्रग्ज प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आर्यन खान आजारी झाला होता. त्यामुळे त्याला चौकशीसाठी जेव्हा बोलवण्यात आलं होतं तेव्हा तो एनसीबी कार्यालयात हजर राहू शकला नव्हता. या प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर विविध आरोप झाले. ज्यानंतर या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आलं. इतर काही प्रकरणंही एसआयटीकडे सोपवण्यात आली. हे कारणही आर्यनने आपल्या अर्जात दिलं आहे. एनसीबीच्या दिल्ली कार्यालयातील अधिकारी एसआयटी मार्फत तपास करत आहेत. त्यामुळे मुंबईतील एनसीबी कार्यालयात जाण्यास भाग पाडलं जाऊ नये असंही आर्यन खानने त्याच्या अर्जात म्हटलं आहे.

आर्यन खान दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावतो आहे. 10 तारखेला जामीनात काही बदल करण्यात यावेत असा अर्ज केल्यानंतरच्या दोन दिवसानंतर तो एनसीबी कार्यालयात हजर राहिला होता. आता याबाबत पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in