Devendra Fadnavis: नवनीत राणांना अटक होताच फडणवीस ठाकरे सरकारवर संतापले!

Devendra Fadnavis Angry: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना खार पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे खूपच संतापले आहेत. पाहा त्यांनी नेमकं काय म्हटलंय.
as soon as navneet rana was arrested devendra fadnavis got angry on thackeray  government
as soon as navneet rana was arrested devendra fadnavis got angry on thackeray government

मुंबई: 'मातोश्री'बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना आज (23 एप्रिल) दिवसअखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी 9 वाजता राणा दाम्पत्य 'मातोश्री'वर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार होतं. मात्र, आता त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. याच कारवाईनंतर आता विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे ठाकरे सरकारवर खूपच संतापले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी दोन ट्विट करुन ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. 'सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे! निव्वळ लज्जास्पद.' असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे सरकारविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

दोन ट्विटमधूनच फडणवीसांनी ठाकरेंवर साधला निशाणा

ट्विट 1: इतकी दंडुकेशाही?

इतका अहंकार?

इतका द्वेष?

सत्तेचा इतका माज?

सरकारच करणार हिंसाचार

एवढीच तुमची मदुर्मकी?

सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या

पण, जनता सारे काही पाहते आहे !

निव्वळ लज्जास्पद

लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला?

लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?

ट्विट 2: महाराष्ट्रातील घटना व्यथित करणार्‍या आहेत.

➡️ भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले : आरोपी अटकेत नाही

➡️ मोहित भारतीय यांच्यावर हल्ला : साधा गुन्हा दाखल नाही

➡️ महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा : साधी दखल सुद्धा नाही

➡️ हनुमान चालिसा पठनाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक

असे ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान नवनीत राणा आणि रवि राणा यांनी दिलं होतं. काही दिवसांपूर्वी 23 एप्रिल रोजी आपण मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं म्हटलं होतं.

त्यानंतर शुक्रवारपासून (22 एप्रिल) मुंबईतील वातावरण तापण्यास सुरूवात झाली. शुक्रवारी सकाळी राणा दाम्पत्य नागपूरहून मुंबईत दाखल झालं. त्यानंतर काल दिवसभर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर तळ ठोकला होता. रात्रभर शिवसैनिक मातोश्रीबाहेर होते. त्यानंतर आज सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

as soon as navneet rana was arrested devendra fadnavis got angry on thackeray  government
Narayan Rane: 'मी स्वत: जाणार राणाच्या घरी, राणाला बाहेर काढणार..', राणेंचं सेनेला खुलं आव्हान

सकाळी शिवसैनिकांनी मातोश्रीबरोबर नवनीत राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर गर्दी करण्यास सुरूवात केली. त्यानंतरही राणा दाम्पत्याने व्हिडीओद्वारे आपण हनुमान चालीसा पठण करण्यासाठी जाणार असल्याची भूमिका घेतलेली होती. त्यानंतर दुपारी त्यांनी भूमिकेवरून माघार घेतली.

सायंकाळी खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानातून ताब्यात घेतलं. पोलीस दोघांना खार पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यानंतर पोलिसांनी कायदेशिर प्रक्रिया पार पाडत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि 153 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in