भारनियमनाविरोधात भाजपचं शनिवारपासून सात दिवस राज्यभर आंदोलन, आशिष शेलारांची घोषणा

अनधिकृत भोंग्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशीही केली आग्रही मागणी
भारनियमनाविरोधात भाजपचं शनिवारपासून सात दिवस राज्यभर आंदोलन, आशिष शेलारांची घोषणा
आशिष शेलार

गुरूवारपर्यंत राज्यात विजेची अघोषित आणीबाणी होती मात्र गुरूवारी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत कबुली दिली आहे. सरकार या सगळ्या गोष्टी जाणूनबुजून करत असून आधी विजेची टंचाई निर्माण करायची आणि चढ्या दराने वीज घेत आणि कंपनीकडून टक्केवारी घ्यायची असा प्रकार सरकारकडून सुरू असल्याची टीका भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली आहे.

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीज निर्मिती केंद्र बंद करण्यात आली असून वीज नाही असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. वीज पुरवठा करणाऱ्या तिन्ही कंपनीचं काम बेशिस्त करण्याचं काम हे या सरकारने केलं आहे. जाणून बुजून सरकार कडून भारनियन निर्माण केलं जातं आहे. आणि याच विरोधात भाजपा उद्यापासून राज्यभर आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील आशिष शेलार यांनी दिला आहे.

भारनियमनाविरोधात भाजपचं राज्यभर आंदोलन

सरकारने जे भारनियमन सुरू केलं आहे त्याविरोधात भारतीय जनता पक्ष उद्यापासून सात दिवस राज्यभर आंदोलन करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.राज्यभर भाजप कार्यकर्ते वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे.

अनधिकृत भोंग्यावर कारवाई ही झालीच पाहिजे

सगळे पक्ष भोंग्यावरून राजकारण करत आहेत मात्र भाजपा भारनियमनावर लक्ष ठेवून आहे असं सांगतच

अजान, भोंगे, हनुमान चालीसा या सगळ्यांना वीज ही लागणारच असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं आहे.

मात्र अनधिकृत भोंग्यावर कारवाई ही झालीच पाहिजे

जर सरकारने अनधिकृत भोंग्याना अधिकृत करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जशास तशे उत्तर देऊ असा इशारा देखील भाजपा सरकारने दिला आहे . त्याचबरोबर जर हनुमान चालीसा कार्यक्रम झाले तर त्याच स्वागतच करू अस स्पष्ट मत आशिष शेलार यांनी व्यक्त केलं आहे.

राणा दाम्पत्य हे काही अतिरेकी नाही : आशिष शेलार

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा हे आज मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार आहेत . त्यामुळं मुंबईत शिवसैनिक अधिकच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेनेच्या या विरोधावरून देखील आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

हनुमान चालीसेला शिवसेनेचा विरोध का आहे असा सवाल करत त्यांनी शिवसैनिक कायदा का हातात घेत आहेत राणा दाम्पत्य ते काही आतंकवादी आहेत का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार त्यांनी शिवसेनेवर केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये रात्रीस खेळ चाले

पोलिसांच्या बदल्या आणि बढत्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये सरकारचा 'रात्रीस खेळ चाले' अशी गत आहे यात अण्णा नाईक नेमका कोण आहे हे शोधण्याची गरज आहे. एकदा बदल्या झाल्या तर मग वीनाकरण निर्णय कोणामुळे बदलेले जात आहेत आणि यात तुमच्यावर कुणाचा दबाव आहे की यात देखील कुणी तुमचा दलाल आहे असा सवाल आशिष शेलार यांनी महविकास आघाडी सरकारला केला आहे .

Related Stories

No stories found.