नवाब मलिक यांनी स्वतःचं नाव आता खयाली मलिक ठेवावं, आशिष शेलारांचा टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या आरोपांची मालिका थांबताना दिसत नाही. अशात आता भाजपचे नेतेही त्यांच्यावर पलटवार करताना दिसत आहेत. आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आशिष शेलार?

दिवाळीनंतर जो बॉम्ब फडणवीस फोडणार आहेत तो फुटण्या आधीच त्या आवाजाला घाबरून त्यांनी कानावर हात कसे ठेवले आहेत हे त्यांच्या बदलेल्या आवाजावरून दिसत आहे. पण दिवाळीनंतर बॉम्ब फुटेलच. समीर वानखेडे यांना चरित्राचा प्रमाणपत्र देणे हे भाजपाचे काम नाही हे मी स्पष्ट करतो. एनसीबीने ड्रग्जच्या विरोधात कारवाई केलीच पाहिजे ही भाजपाची मागणी आहे. विरोधकांनी विषय भरकवटण्याचा प्रयत्न केला तरी ड्रग्ज कितीही प्रमाणात असले तरी जर तो कायद्यामध्ये गुन्हा असेल आणि ड्रग्जच्या मोजमापावर कारवाई ठरत असेल तर ती आम्हाला मान्य नाही. ड्रग्ज मिळाले तर एनसीबीने कारवाई केली पाहिजे ही आमची मागणी आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आर्यन खानला अटक झाल्यानंतर नवाब मलिक जी माहिती देत आहेत ती सर्वसाधारण माहिती आहे. ही माहिती तुमचा जावई आत असताना गुप्त का ठेवलीत? हे आरोप नवाब मलिकांनी आज सांगावे असे वाटत असल्याने आठ महिने लपवले असतील. हे आरोप आठ महिने लपवण्याचे कारण काय याचे उत्तर नवाब मलिकांनी दिले पाहिजे असंही शेलार यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

सगळ्या लपवाछपवीचा घटनाक्रम पाहता नवाब मलिक यांची सवयच लपवा छपवीची आहे आणि त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यातील काही आरोप गंभीर देखील आहेत. म्हणून आमची मागणी आहे की नवाब मलिक यांची आणि ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांची नार्को टेस्ट करावी. राज्य सरकारनेच दोघांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

आम्ही शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीला दुष्मन मानत नाही. जे या या पुरोगामी महाराष्ट्रात गृहमंत्री म्हणून होते. त्यांना न्यायालयाने सांगितल्यानंतर सीबीआयने प्रकरण हातात घेतल्यानंतर आणि ईडीसमोर आलेल्या माहितीवर अटक करावी लागली. हा राज्याच्या प्रतिमेला तडा देणारा वेदनादायी हा प्रसंग आहे. पण भष्ट्राचाराच्या लढाईत जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक कारवाईशिवाय पर्याय नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कितीही आव आणला तरीही पळ काढता येणार नाही. अनिल देशमुखांनी शरद पवारांचा आदर्श ठेवायला हवा होता. अनिल देशमुखांना सर्व रस्ते बंद झाल्यानंतर शरण यावे लागले असंही शेलार म्हणाले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT