Astrazeneca चा बूस्टर डोस ओमिक्रॉनविरोधात लढण्यासाठी प्रभावी, स्टडीमध्ये समोर आलं निरीक्षण

Astrazeneca चा बूस्टर डोस ओमिक्रॉनविरोधात लढण्यासाठी प्रभावी, स्टडीमध्ये समोर आलं निरीक्षण

जगभरात कोरोना व्हायरस पुन्हा थैमान घालतो आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसोबत लढण्याची तयारी सुरू असतानाच ओमिक्रॉन या व्हायरस व्हेरिएंटनेही टेन्शन वाढवलं आहे. अशात कोरोनाच्या या व्हेरिएंटला रोखण्यासाठी कोव्हिड व्हॅक्सिनचा बूस्टर डोस मोलाची कामगिरी करतो आहे.

आता अॅस्ट्राझेन्का या कंपनीने त्यांचं व्हॅक्सिन Vaxzevria व्हॅक्सिजेव्रिया बाबत हा दावा केला आहे की या लसीचा बूस्टर डोस ओमिक्रॉनचं संक्रमण रोखण्यासाठी प्रभावशाली ठरू शकतो. एवढंच नाही तर हा बूस्ट डोस बीटा, डेल्टा, अलाफा, गामा आणि इतर अनेक व्हेरिएंटच्या विरोधात लढण्यासाठीही प्रभावी ठरतो आहे. हा बूस्टर डोस घेतल्यानंतर अँटीबॉडीज तयार होत आहेत. त्याचा फायदा रूग्णाला होतो आहे.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या निरीक्षणात ही बाब समोर आली आहे. अॅस्ट्राझेन्काने ऑक्सफोर्ड विद्यापीठासोबत एकत्र येत ही लस तयार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून याबाबत निरीक्षणं करण्यात आली. त्यानंतर ही बाब समोर आली आहे व्हॅक्सेजेव्रियाचा बूस्टर डोस हा ओमिक्रॉनशी लढण्यासाठीही प्रभावी ठरतो आहे. सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनीही ही बाब ट्विट करून सांगितली आहे.

India Today

ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रमुख एंड्र्यू पोलार्ड यांनी असं म्हटलं की आहे या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर ज्यांनी ज्यांनी बूस्टर डोस घेतला आहे त्यांना या लसीचा फायदा झाला आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झाला नाही असं पाहण्यास मिळालं आहे. व्हॅक्सेजेव्रियाचा बूस्टर डोस हा कोरोनाशी लढण्यात आणि त्याच्या विविध व्हेरिएंटशी लढण्यासाठी प्रभावी ठरू शकते आहे.

एका ब्रिटीश निरीक्षणामध्येही हे अभ्यासलं गेलं आहे की अॅस्ट्राझेन्काची लस ही बूस्टर म्हणून प्रभावी ठरते आहे. बूस्टर डोस दिल्यानंतर रूग्णांमध्ये, ज्यांनी लस घेतली त्यांच्या शरीरात अँटी बॉडी वाढल्या. या सगळ्या गोष्टी कोरोनाशी लढण्यासाठी प्रभावी ठरत आहेत असा दावा करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in