Babasahe Purandare : बाबासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना

पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शरद पवार, देवेंद्र फडणवीस यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक...
Babasahe Purandare : बाबासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना
बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत सोमवारी (१५ नोव्हेंबर) पहाटे मालवली. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक भावना व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही ट्वीट केले आहेत. ज्यात त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्या जातील, असं म्हटलेलं आहे.

"शब्दात व्यक्त करता न येणार दुःख झालं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळेच येणाऱ्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्या जातील. त्यांनी केलेलं इतर कार्यही कायम स्मरणात राहिल."

"शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या प्रचंड कामाच्या माध्यमातून कायम जिवंत राहतील. या दुःखद प्रसंगी माझे सहवेदना त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या असंख्य चाहत्यासोबत आहेत. ओम शांती', अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
"सावरकर मला म्हणाले, 'फक्त लोकांच्या नकलाच करू नकोस"; बाबासाहेबांनी सांगितलेला किस्सा

अमित शाहांनी वाहिली श्रद्धांजली

"काही वर्षांपूर्वी पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याचे सौभाग्य लाभले. त्यांची ऊर्जा व विचार प्रेरणादायी होते. आज त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांचे कुटुंबीय व प्रशंसकांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. आई भवानीच्या चरणी त्यांना चिरशांती लाभो", असं शाह यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी शेअर केले बाबासाहेबांसोबतचे फोटो

प्रख्यात शिवशाहीर, महाराष्ट्रभूषण, पद्मविभूषण, सिद्धहस्त लेखक श्री बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यातून निघून गेले. मनाला अतिशय वेदना होत आहेत आणि त्यांच्या आठवणी, त्यांच्या सहवासात घालविलेले क्षण डोळ्यापुढे येत आहेत, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही फोटो शेअर केले आहेत.

बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
Babasaheb Purandare यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पुणेकरांची गर्दी

शरद पवारांनी यांनी व्यक्त केला शोक

"शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!", अशा शब्दात शरद पवार यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

बाबासाहेब पुरंदरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी.
Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देण्यावरून का झाला होता वाद, कोणी केला होता विरोध?

बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी...

बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी पुण्यात झाला होता. त्यामुळे पुणे हीच त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लिहण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी ‘नारायण राव पेशवा',‘केसरी’यासारखी अनेक पुस्तकं लिहली. पण 'राजा शिवछत्रपती' या कांदबरीने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. याच कांदबरीमुळे बाबासाहेब हे महाराष्ट्रातील घराघरात पोहचले.

याच कादंबरीवर आधारित पुरंदरे यांनी ‘जाणता राजा’हे नाटकही लिहलं. जे महाराष्ट्रात प्रचंड गाजलं. त्यांनी खऱ्या अर्थाने एका भव्यदिव्य नाटकांची निर्मिती केली होती. ज्याच हिंदीत देखील अनुवाद करण्यात आला होता. दरम्यान, फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्काराने सन्मानित केलं होतं. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते देखील होते. अनेकदा ते संघाच्या जाहीर कार्यक्रमात देखील सहभागी व्हायचे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in