"सावरकर मला म्हणाले, 'फक्त लोकांच्या नकलाच करू नकोस"; बाबासाहेबांनी सांगितलेला किस्सा

बाबासाहेबांनी शिवकालीन इतिहासाचा धांडोळा घेण्यासाठी झपाटल्यासारखं काम केलं. पण, त्यांच्या या झपाटलेपणामागे बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत झालेल्या भेटीलाही अनन्यसाधारण महत्व आहे.
"सावरकर मला म्हणाले, 'फक्त लोकांच्या नकलाच करू नकोस"; बाबासाहेबांनी सांगितलेला किस्सा
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज निधन झालं. शिवकाळाचा चालतं-बोलतं विद्यापीठ असलेल्या बाबासाहेबांनी विपुल लेखन केलं. बाबासाहेबांनी शिवकालीन इतिहासाचा धांडोळा घेण्यासाठी झपाटल्यासारखं काम केलं. पण, त्यांच्या या झपाटलेपणामागे बालपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत झालेल्या भेटीलाही अनन्यसाधारण महत्व आहे. लहानपणी बाबासाहेब स्वातंत्र्यवीर सावरकरांची नक्कल करायचे. याची माहिती सावरकरांच्या कानावर गेली. त्यानंतर त्यांनी बाबासाहेबांना बोलावून घेतलं. त्याचा किस्सा बाबासाहेबांनी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितला होता.

बाबासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी सांगितलेली आठवण...

"गणपतराव नलावडे पुण्यातील त्याकाळचे पुढारी होते. त्यांचं माझ्यावर फार प्रेम होतं. एकदा ते मला सोबत घेऊन सावरकर मुक्कामी असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. त्यावेळी सावरकरांचा मुक्काम पुण्यातील केशरीवाड्यात होता. तिथे नलावडे सावरकरांना म्हणाले, 'तात्या हा पोरगा तुमची उत्तम नक्कल करतो, ऐकायची ना?' त्यावर सावरकर म्हणाले, 'हो, कर.'"

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Babasaheb Purandare: बाबासाहेब पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' देण्यावरून का झाला होता वाद, कोणी केला होता विरोध?

"ते म्हणाले, 'कर. काय करतोस.' त्यांच्या व्याख्यानातील एक उतारा मी त्यांच्याच शैलीत बोलून दाखवला. ते एकूण तिथे असलेली मंडळी भारावली. कारण मी हुबेहुब सावरकरांचा आवाज आणि हातवारे केले होते. मी केलेली त्यांची नक्कल बघितल्यानंतर सावरकरांनी मला जवळ बोलावून घेतलं."

"त्यांच्यापासून अंदाजे 15 फुटांच्या अंतरावर उभा होतो. त्यांनी बोलावल्यानंतर मी त्यांच्याजवळ गेलो. नमस्कार करण्यासाठी वाकलो. त्यावेळी त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, 'उत्तम. फारच छान. पण आयुष्यभर केवळ लोकांच्या नकलाच करू नकोस. तुझं स्वतःचं काही असू दे.' त्या दिवसापासून मी नकला करणं बंद केलं."

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
Babasaheb Purandare passed away: शिवछत्रपतींचा चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड, बाबासाहेब पुरंदरेंचं पुण्यात निधन

"मला भारतातच पुर्नजन्म मिळावा..."

या मुलाखतीत बाबासाहेबांनी भारतातच पुर्नजन्म मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. "महत्वाकांक्षी व हौशी माणुस कधीही पूर्णपणे समाधानी होत नाही. माझ्या वयाच्या ९९ वर्षात परमेश्वराने मला खूप काही मिळविण्याची ताकद दिली. त्याप्रमाणे मी प्रयत्नही करत गेलो. छत्रपती शिवाजी महाराज हा समजून घेण्याचा मोठा विषय आहे. त्यामुळे त्याविषयी अभ्यास, वाचन, लेखन करुन स्वत: काहीतरी निर्माण करण्याचा मी प्रयत्न केला. परंतु अजूनही खूप काही समजून घ्यायचे आहे, त्यामुळे वयाच्या ९९ वर्षांमध्ये मी आनंदी आहे, पण समाधानी व तृप्त नाही. मला भारतातच पुर्नजन्म मिळावा आणि अपुरे सर्व काही पूर्ण व्हावे", अशा भावना बाबासाहेबांनी व्यक्त केल्या होत्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ही मुलाखत घेण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in