बंडातात्या कराडकर यांचं महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य, नव्या वादाला तोंड फुटणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वारकरी संप्रदायाचे प्रमुख बंडातात्या कराडकर हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. कारण आता त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसंच हे वक्तव्य लोकमान्य टिळक यांनी केल्याचाही दावा बंडातात्या कराडकर यांनी केला आहे. पुण्यातल्या राजगुरूनगर या ठिकाणी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव दिनी त्यांनी एक भाषण केलं. त्या भाषणात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे.

वादग्रस्त आरोपांमुळे चर्चेत आलेले हभप बंडातात्या कराडकर आहेत कोण?

नेमकं काय म्हणाले बंडातात्या कराडकर?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी केलेली क्रांती ही अभूतपूर्व होती. सुरूवातीच्या काळात भगतसिंग यांनाही महात्मा गांधी प्रेरणास्थान वाटत होते. महात्मा गांधी यांचा अहिंसावाद त्यांच्या मनावर कोरला गेला होता. मात्र 1922 मध्ये जे हत्याकांड झालं त्यानंतर भगतसिंग भ्रमाचा भोपळा फुटला. या म्हाताऱ्याच्या मार्गावर चालून काहीही होणार नाही हे त्यांना समजलं. लोकमान्य टिळक नेहमी म्हणायचे की या म्हाताऱ्याच्या पद्धतीने स्वराज्य मिळवायचं असेल तर ते मिळवायला एक हजार वर्षे लागतील. महात्मा गांधी यांचा अहिंसावाद आणि हिंदुत्व हे दोन्ही पक्षपातीच आहे. त्या विषयात आपण घुसायचं नाही असंही बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

बंडातात्या कराडकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. कारण त्यांनी महात्मा गांधी यांचा एकेरी उल्लेख केला आहे. म्हातारा असं त्यांनी महत्मा गांधींना संबोधलं असून ते संबोधन लोकमान्य टिळक करत असत असाही दावा बंडातात्यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

‘पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे दोघीही दारू पिऊन…’ बंडातात्या कराडकर यांचा खळबळजनक आरोप

ADVERTISEMENT

बंडातात्या कराकडर असंही म्हणाले की भगतसिंग यांना हे कळून चुकलं की या म्हाताऱ्याच्या मार्गाने जायचं नाही. त्यानंतर ते क्रांतिकारक बनले. 1947 ला मिळालेलं स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालेलं नाही. 1942 ला जी क्रांतिकारक चळवळ उभी राहिली, चले जाओ, क्विट इंडिया या सगळ्यामुळे मिळालं आहे. या चळवळीत पोलिसांची कार्यालयं पेटवणं, सरकारी कार्यालयं पेटवणं, रेल्वे रूळ उखडणे या घटना घडल्या. ज्यामुळे इंग्रजांना समजलं की आपल्याला देश सोडण्यावाचून आता पर्याय नाही.

3 फेब्रुवारीलाही बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

साताऱ्यात बंडातात्या कराडकर यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना बंडातात्या कराडकर यांनी नेत्यांची मुलं रस्त्यावर दारू पिऊन पडत असल्याचे पुरावे आहेत असं म्हटलं होतं. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे दारू पितात. नेत्यांची मुलं दारू पिऊन रस्त्यावर पडतात असं म्हटलं होतं. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली. एवढंच नाही तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची जोडी म्हणजे ढवळ्याशेजारी पोवळा बांधला वाण नाही पण गुण लागला अशी आहे असं म्हणत सरकारवरही टीका केली होती. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT