जानेवारीमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांची लॉटरी; कधी आणि किती आहेत सुट्ट्या?

bank holidays in january 2022 : आठवडी सुट्ट्यांबरोबरच बँकांना इतरही 9 सुट्ट्या...
जानेवारीमध्ये बँकांना सुट्ट्याचं सुट्ट्या
जानेवारीमध्ये बँकांना सुट्ट्याचं सुट्ट्या

नव्या वर्षातील पहिल्याच महिन्यात बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे नव्या वर्षात बँकेतील काम निपटवण्याचं नियोजन केलेल्या नागरिकांना याचा फटका बसू शकतो. कारण जानेवारीमध्ये तब्बल 16 दिवस बँका बंद राहणार (bank holidays in january) आहेत. यात काही सुट्ट्या विशिष्ट राज्यांसाठीच असल्यानं इतर राज्यांत त्या लागू होणार नाही. मात्र, जवळपास 10 ते 12 दिवस बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे.

आठवडी सुट्ट्यांशिवाय इतर सुट्ट्या

रिझर्व्ह बँकेकडून देशभरातील बँकांच्या सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात येतं. या वेळापत्रकानुसार जानेवारी महिन्यात बँकांना तब्बल 16 दिवस सुट्ट्या असणार आहेत. (यातील काही सुट्ट्या काही राज्यांसाठीच आहेत.) आठवडी सुट्ट्यांशिवाय 9 दिवस बँका बंद राहणार आहेत. यातील काही सुट्ट्या देशभरातील बँकांसाठी लागू असणार आहे, तर काही सुट्ट्या स्थानिक (राज्यातील) सण-उत्सवांच्या असणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे नव्या वर्षाच्या पहिल्या दोन दिवशीच बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांचं गिफ्ट मिळालं आहे.

नव्या वर्षाची सुरुवात शनिवारपासून होत आहे. शनिवारी म्हणजेच 1 जानेवारी रोजी देशभरातील बँकांना सुटी आहे. त्यानंतर 2 जानेवारी रोजी रविवार असल्यानं बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर 3 जानेवारीपासून बँकांचं काम सुरू होणार आहे.

कोणत्या दिवशी बँका असणार बंद?

1 जानेवारी : देशभर नव्या वर्षाची सुट्टी

2 जानेवारी : रविवार

4 जानेवारी : सिक्कीममधील बँकांना सुट्टी

8 जानेवारी : दुसरा शनिवार

9 जानेवारी : रविवार

11 जानेवारी : मिशनरी डे (फक्त मिझोराममधील बँकांना सुट्टी)

12 जानेवारी : स्वामी विवेकानंद जयंती

14 जानेवारी : मकरसंक्रात/पोंगल (बहुतांश राज्यांमध्ये बँकांना सुट्ट्या)

15 जानेवारी : उत्तरायण, संक्रात (पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सुट्टी)

16 जानेवारी : रविवारी

18 जानेवारी : ताईपुसम (फक्त तामिळनाडूमध्ये सुट्टी)

22 जानेवारी : चौथा शनिवार

23 जानेवारी : रविवार

26 जानेवारी : प्रजासत्ताक दिन

30 जानेवारी : रविवार

31 जानेवारी : (फक्त आसाममधील बँकांना सुट्टी)

या सेवा सुरूच राहणार

सुट्ट्यांच्या काळात बँका बंद राहणार असल्या तरी ऑनलाईन बँकिंग सेवा सुरुच असणार आहे. इतर डिजिटल बँकिंग सेवाही सुट्टीच्या काळात सुरू राहणार असल्यानं ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना त्रास होणार नाही. इंटरनेट बँकिंग, युपीआय आधारित बँकिंग सेवा, मोबाईल बँकिंग या सर्व सेवांच्या माध्यमांतून बँकेतील काम करता येणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in