'पाटील दिल्ली गाजवतील'; मनसे आमदाराकडून भाजपच्या मंत्र्यासाठी बॅनर, BJP-MNS एकत्र येणार का?

MNS MLA Banner for BJP Minister: भाजप आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. एका बॅनरमुळे अशी चर्चा सुरु झाली आहे.
BJP-MNS
BJP-MNS

मिथिलेश गुप्ता, डोंबिवली

डोंबिवली: केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. एकीकडे भाजपाचे (BJP) केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना जुन्या मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणार फलक झळकवित साऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी 'पाटील दिल्ली गाजवतील' असा हटके बॅनर लावला आहे.

केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील (Kapil Patil) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जन आशिर्वाद यात्रा सुरू झाली आहे. एकीकडे भाजपाचे (BJP) केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना जुन्या मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा देणार फलक झळकवित साऱ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी 'पाटील दिल्ली गाजवतील' असा हटके बॅनर लावला आहे.

आगरी समाजातील नेत्याला प्रथमच कपिल पाटील यांच्या रुपात केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळाले आहे. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच इतर पक्षातील आगरी समाजातील नेते, कार्यकर्ते यांनीही त्यांना शुभेच्छा देणारे फलक शहरात सर्वत्र झळकावले आहेत.

दरम्यान, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरले असले तरी त्यावरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यात मनसे आमदार राजू पाटील यांनी हटकेच संदेश देणारा बॅनर झळकविल्याने एका नवे संदेश दिला आहे.

'पाटील दिल्ली गाजवतील' अशा शुभेच्छा देणारा बॅनर मनसेच्या एकमेव आमदाराने भाजपच्या मंत्र्यासाठी झळकवल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

बॅनरवर घरातील सर्वांचे फोटो लावून आपला घरोबा खासदार पाटील यांच्याशी असल्याने आपण या शुभेच्छा दिल्या, यात पक्षाचा काही सहभाग नाही. अशी आपली भूमिका आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केली आहे.

मात्र, असं असलं तरी राजू पाटील यांनी स्वत: राज्यमंत्र्यांचं अगदी बँडबाजा वाजवून स्वागत केलं. एवढंच नव्हे तर मंत्री कपिल पाटील यांच्यसोबत ते आशीर्वाद यात्रेत सहभागी देखील झाले होते. त्यांच्याच गाडीतून राजू पाटील काही जन आशीर्वाद यात्रेसाठी प्रवासही केला. त्यामुळे हे दोन्हा पक्ष आता हळूहळू जवळ येऊ लागले आहेत.

BJP-MNS
MNS, BJP युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, आगामी काळात भाजप आणि मनसे युती करण्याची शक्यता आहे. त्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वीच भेटही झाली होती. तेव्हापासून भाजप-मनसे युतीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in