बार्शीच्या तरूणाने शोधला Facebook Instagram वरचा बग, मिळवले 22 लाखांचे बक्षीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इंस्टाग्रामवरचा एक बग शोधून काढला आणि फेसबुकला कळवला आणि कोट्यवधी लोकांची प्रायव्हसी वाचवली, हा बग फेसबुकला कळवल्यानंतर फेसबुकने त्याला तब्बल 22 लाखांचे बक्षीस दिलंय. भारतातील आयटीच्या नव्या नियमांवरून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे; परंतु आपण वापरत असलेले इन्स्टाग्राम किंवा फेसबुक किती सुरक्षित आहे हे आपल्याला माहिती आहे काय? जगाच्या कानाकोपऱ्यात गुन्हेगारी वृत्तीचे हॅकर्स बसले आहेत. ही बाब कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेत असलेल्या बार्शीतील मयूर फरताडे याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामला हे बग कळवून हॅकर्सच्या हातात येण्यापासून वाचविले. त्याची दखल घेत फेसबुकने त्याला 22 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसा मेल त्याला पाठविला आहे.

मयूर फरताडे याने बग शोधला आणि अनेक वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यापासून फेसबुकला वाचविले. इन्स्टाग्रामचा हा बग एखाद्या युजरला इन्स्टाग्रामवर टार्गेटेड मीडिया दाखवू शकत होता. मीडिया आयडीची मदत घेऊन कोणत्याही युजरचे खासगी आणि अर्काइव्ह केलेल्या पोस्ट, स्टोरी, रील आणि IGTV व्हिडिओही बघता येत होते. यासाठी त्या युजरला फॉलो करणे गरजेचे नव्हते. फेसबुक व इन्स्टाग्रामलासुद्धा त्याच्या दोषांची माहिती नव्हती. मयूरने फेसबुकच्या बग बॉउंटी प्रोग्रॅमच्या माध्यमातून या त्रुटींची माहिती १६ एप्रिलला दिली होती. कंपनीने १५ जूनपर्यंत ही चूक सुधारली आहे

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बार्शी तिथं सरशी म्हणतात ते काही खोटं नाही, बार्शी ही विविध नाविन्यपूर्ण कल्पनांची आणि खाण आहे त्याच्यातून मयूरसारखे हिरे सतत निपजत असतात, फक्त त्याकडे शासन,प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

एकीकडे केंद्र सरकार आणि सोशल मीडिया यांच्यामध्ये नव्या नियमांवरून वाद सुरू होता हे आपण पाहिलं. ट्विटरवर काही दिवसांपूर्वीच कारवाईही करण्यात आली. ट्विटरने नव्या नियमांचं पालन न केल्याने हे पाऊल उचलण्यात आलं. अशात बार्शीच्या एका तरूणाने महत्त्वाचा म्हणता येईल असा बग शोधून काढला आहे. ज्यानंतर त्याला 22 लाख रूपयांचं बक्षीस मिळालं आहे.

ADVERTISEMENT

समजून घ्या : Twitter India आणि मोदी सरकारमध्ये नेमका वाद काय? का दाखल झाला FIR?

ADVERTISEMENT

या बक्षीसाबद्दल मयूरने आणि त्याच्या आई वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. आपल्या मुलाने मिळवलेलं यश हे आम्हाला समाधान मिळवून देणारं आहे असंही त्याच्या आई वडिलांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT