Beed: सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेची गळफास घेत आत्महत्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Pregnant woman committed suicide: बीड: ‘पती दारू पिऊन यायचा आणि त्रास द्यायचा, कधी कधी चारित्र्यावर संशय घ्यायचा..’ असं म्हणत गर्भवती असणाऱ्या महिलेने (Pregnant Woman) गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) शहरात घडली आहे. गजाला इरफान शेख (वय 22, रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विवाहित ही सहा महिन्यांची गर्भवती असल्याची माहितीही यावेळी समोर आली आहे. दरम्यान, गजाला हिच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा असल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. (beed six month pregnant woman commits suicide by hanging herself)

गजालाची आई खालेदा जमीर शेख यांच्या फिर्यादीनुसार गजालाचे लग्न पाच वर्षापूर्वी इरफान सोबत झाले होते. त्यांना एक मुलगीही आहे. सुरुवातीचे दोन वर्ष चांगले गेल्यानंतर इरफान अचानक गजालाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यानंतर तो दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला आणि दिवसेंदिवस त्याचं व्यसन वाढतचं गेलं. इरफान दारू पिऊन आल्यानंतर गजाला हिला शिवीगाळ करत बेदम मारहाण करायचा.

Avinash Manatkar: भाजप नेत्याच्या पतीची आत्महत्या, माजी आमदारावर गंभीर आरोप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, गजालाच्या माहेरच्या लोकांनी वारंवार समजावून देखील त्याच्या वागणुकीत फरक पडला नाही. तर तो वारंवार गजाला हिच्याकडे माहेरहून 1 लाख रुपये घेऊन यावं म्हणून तगदा लावत होता. रिक्षा घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये आणावे असं म्हणत इरफान तिचा नेहमीच छळ करायचा. मागील सहा महिन्यांपासून गजालाला तो रोजच मारहाण करत असल्याचं फिर्यादित म्हटलं आहे.

या सगळ्या प्रकाराला त्रासून गजाला ही तीन महिन्यांपूर्वी माहेरी निघून आली होती. परंतु, तिला चांगले वागविण्याचे कबूल करून इरफान तिला परत आपल्या घरी घेऊन आला होता. त्यानंतर थोडे दिवस चांगलं वागवून पुन्हा त्याने गजालाला मारहाण सुरु केली. अखेर या त्रासाला कंटाळून गजालाने अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागातील राहत्या घरी रविवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

ADVERTISEMENT

पुण्यात खळबळ! अवघ्या कुटुंबाची आत्महत्या! पती-पत्नीसह मुलांनी घेतलं विष

ADVERTISEMENT

या आत्महत्या प्रकरणी इरफान शेख याच्यावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात असून कलम 306, 498अ, 323, 504, 506 अंतर्गत त्याच्यावर कारवाई करण्यात येणर आहे. गुन्हा दाखल होताच इरफान शेख याल पोलिसांनी अटक करून त्याला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानेही त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT