बीड : पोलिसांकडून हवाला रॅकेटचा पर्दाफाश, ५१ लाखांची बेहिशोबी रोकड जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड पोलिसांनी शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटचा पर्दाफाश केलाय. आयकर चुकवून पैशांचा बेकायदा व्यवहार करणारे हे हवाला रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने, बीड शहरात ३ ठिकाणी छापेमारी करत ५१ लाखांची रक्कम जप्त केली आहे. हे रॅकेट चालवणाऱ्या ३ व्यवस्थापकांना पोलिसांनी अटक केली आहे.

आयकर चुकवून टोकन पैशांची देवणा-घेवाण करणारे काही जण बीडमध्ये हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती पंकज कुमावत यांना मिळाली होती. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापेमारी करत ही कारवाई केली. पोलीस पथकाने शहरातील कबाड गल्लीतील न्यू इंडिया अंगडिया येथे कारवाई करत ३५ लाख ७९ हजार रुपये, जालना रोडवरील आर. क्रांती ट्रेडर्स येथे ९ लाख रुपये तर सिध्दीविनायक व्यापारी संकुलासमोर कारवाईत ६ लाख ४१ हजार रुपये, अशी एकूण ५१ लाख २६ हजार रुपयांची बेकायदा रोकड जप्त केली आहे.

यावेळी पोलिसांनी मयूर विठ्ठल बोबडे, हरीश रतीलाल पटेल, सूरज पांडुरंग घाडगे या तीन व्यवस्थापकांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या कारवाईने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून आणखी हवाला रॅकेटचे मोहरे पोलिसांच्या ताब्यात लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नागपूर : फेब्रुवारी महिन्यात शहरात एकही हत्येचा गुन्हा नाही, नागरिकांसाठी आनंदाची बातमी

    follow whatsapp

    ADVERTISEMENT