Bhaubeej 2021: भाऊबीज शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

Whatsapp Quotes on Bhaubeej 2021: दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज आहे. यंदा 5 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाणार आहे. याचनिमित्ताने द्या खास शुभेच्छा
Bhaubeej 2021: भाऊबीज शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes
Bhaubeej 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi

Bhaubeej 2021 whatsapp Marathi wishes and Messages: भाऊबीज (Bhaubeej)हा दिवाळीमधील सर्वात महत्त्वाचा सण आहे. हा दिवस भाऊ बहिणीच्या नात्याचा खास दिवस असतो. वर्षातील अत्यंत महत्त्वाचा सण अशी याची ओळख आहे. घरोघरी दिवे आणि रोषणाई करुन हा सण साजरा केला जातो.

भाऊबीज या सणाला हिंदू धर्मात खूपच महत्त्व आहे. याच दिवशी बहीण भावाला ओवाळते. यावेळी भाऊ-बहीण एकमेकांना भेटवस्तू देऊन एकमेकांबाबतचं प्रेम व्यक्त करतात. पण कोरोना संकटामुळे यंदाही दिवाळी अनेक कार्यक्रमांवर काही प्रमाणात बंधनं ही आहेत. त्यामुळे सध्या भेटी-गाठी देखील कमीच झाल्या आहेत. मात्र, असं असलं तरीही पण आपण आपल्या प्रियजनांना भाऊबीजेच्या शुभेच्छा नक्कीच देऊ शकता.

भाऊबीज सणाचं महत्त्व मोठं आहे. त्यामुळे या सणाच्या निमित्ताने अनेक कुटुंब दरवर्षी एकत्र येतात. याच सणाच्यानिमित्ताने अनेक जण खास शुभेच्छा देण्यासाठी एकमेकांच्या घरी देखील जातात. पण सध्याच्या काळात हे अनेकांना शक्य होतं नाही. म्हणून अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच शुभेच्छा पाठवतात. आपणही आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-परिवाराला या खास शुभेच्छा पाठवू शकतात.

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

बहिण-भावाच्या अतूट नात्याची रेशीमगाठ अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीजेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

भाऊबीज आणि दिवाळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

उत्सव नात्याचा, बहीण भावाच्या प्रेमाचा असेच बहरत राहो हे नाते, पूर्ण होवो सर्व इच्छा लक्ष लक्ष दिव्यांसह भाऊबीजेच्या शुभेच्छा..!

भाऊबीज आणि दिवाळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

नाते भाऊ बहिणीचे, नाते पहिल्या मैत्रीचे

बंध प्रेमाचे - अतूट विश्वासाचे.

भाऊबीज आणि दिवाळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

विश्वास,आपुलकी, प्रेम, जिव्हाळा म्हणजे भावा-बहिणीचे नाते...

भाऊबीज आणि दिवाळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

(फोटो सौजन्य: Twitter)

बहीण-भावाचं नातं वृद्धिंगत करणारा हा दिवस अर्थात भाऊबीज.

भाऊबीज आणि दिवाळीच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

सध्या कोरोनाचं संकट कमी झालेलं असलं तरी ते पूर्णपणे संपलेलं नाही. त्यामुळे सरकारकडून काही निर्बंध कायम आहेत. अशात जर आपल्याला कोरोनाचा समूळ नायनाट करायचा असेल तर सरकारकडून जारी करण्यात आलेले नियम पाळणं गरजेचं आहे. त्यातही महत्त्वाचा म्हणजे सोशल डिस्टन्सिंग अत्यंत आवश्यक आहे. अशावेळी जर आपण जर बाहेर पडू शकत नसाल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून भाऊबीजेच्या शुभेच्छा देऊ शकता.

Bhaubeej 2021 whatsapp facebook status wishes images quotes photos greeting message in marathi
Diwali 2021: दिवाळीनिमित्त शुभेच्छा Facebook आणि Whatsapp मेसेज, Wishes

सोशल मीडियामुळे आता आपल्याला शुभेच्छा पाठविण्यसाठी WhatsApp, फेसबुक, इंस्टाग्राम यासारखे अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. याचद्वारे आपण Messages आणि Wishes पाठवू शकतात. यासाठी काही खास मराठी शुभेच्छा असलेले कार्ड (Bhaubeej 2021 wishes and Quotes) आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर (Whatsapp) आणि सोशल मीडियावर हे शुभेच्छा मेसेज आपण एकमेकांना पाठवू शकतात.

भाऊबीज सणानिमित्त 'मुंबई तक'कडून देखील आपल्याला मन:पूर्वक शुभेच्छा!

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in