Hemangi Kavi Post : तेव्हा कुठे होत्या हेमांगी कवी? तृप्ती देसाई यांचा सवाल

हेमांगी कवीने लिहिलेली बाई, बुब्स आणि ब्रा ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे
Hemangi Kavi Post : तेव्हा कुठे होत्या हेमांगी कवी? तृप्ती देसाई यांचा सवाल

अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या फेसबुक पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. बाई, बुब्स आणि ब्रा ही पोस्ट लिहिल्यानंतर त्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. अनेकांनी तिच्या भूमिकेचं स्वागत केलं आहे. मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी महिलांच्या अंतर्वस्त्रांवरून पोस्ट लिहिणाऱ्या हेमांगी कवी यांना प्रश्न विचारले आहे. तृप्ती देसाई यांनी या पोस्टचं स्वागत केलं असलं तरीही काही प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत.

हेमांगी कवीने तिचा एक पोळ्या लाटतानाचा व्हीडिओ पोस्ट केला होता. त्यावरून तिला काही लोकांनी ट्रोल केलं तसंच सल्लेही दिले. त्यामुळे संतापलेल्या हेमांगीने ट्रोलर्सना उत्तर देणारी एक पोस्ट लिहिली आहे. बाई, बुब्स आणि ब्रा असं या पोस्टचं शीर्षक आहे. ब्रा न घालण्याचं स्वातंत्र्य बाईला का असू नये असा त्या पोस्टचा सारांश आहे. महिलांना होणारा त्रासही या पोस्टमध्ये हेमांगीने नेमका पकडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. मात्र तृप्ती देसाई यांनी काही प्रश्न हेमांगी कवीला विचारले आहेत.

हेमांगी कवीला तृप्ती देसाईंनी विचारलेले प्रश्न

शिर्डीतल्या ड्रेस कोडच्या विरोधात आम्ही अलिकडेच आंदोलन केलं संपूर्ण राज्यात रान पेटवलं होतं तेव्हा महिलांच्या त्रासाबद्दल बोलणाऱ्या हेमांगी कवी कुठे होत्या?

किर्तनकार इंदुरीकर महाराज हे त्यांच्या किर्तनातून महिलांची बदनामी होईल अशी वक्तव्यं करतात तेव्हा हेमांगी कवी व्यक्त का होत नाहीत?

मासिक पाळीच्या वेळी महिलांशी दुजाभाव केला जातो. अनेक ठिकाणी त्यांना बंदी घातली जाते त्यावर आम्ही कृतीतून बोलत होतो असावेळी या अभिनेत्री कुठे असतात?

फोटो
फोटो सौजन्य, हेमांगी कवी, फेसबुक पेज

हे तीन प्रश्न भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी अभिनेत्री हेमांगी कवीला विचारले आहेत. एकीकडे हेमांगीच्या पोस्टचं कौतुक होतं आहे. तिने लिहिलेली पोस्ट धाडसी आहे. वेगळा विचार मांडणारी आहे. स्त्रियांना असणारं स्वातंत्र्य दर्शवणारी आहे असं म्हटलं जात असतानाच त्या पोस्टवर आता तृप्ती देसाई यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आता या प्रश्नांना हेमांगी कवी उत्तर देणार का? हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

आणखी काय म्हणाल्या तृप्ती देसाई ?

हेमांगी कवी यांनी आत्ता केवळ एक लेख लिहिला आहे. पण आम्ही भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून नो ब्रा डे साजरा करण्याचं ठरवलं आहे. आमच्या उपक्रमात त्या सहभागी होतील अशीही अपेक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in