मोठी बातमी: मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली, सचिन वाझे प्रकरण भोवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: अँटेलिया संशयित कार, मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे अटक हे संपूर्ण प्रकरण आता मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना भोवलं आहे. कारण आज (17 मार्च) परमबीर सिंग यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन (Mumbai Police Commissioner) तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता हेमंत नगराळे (Hemant Nagrale) हे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त असणार आहे. (big decision of the thackeray government mumbai police commissioner Param Bir singhs transfer)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (16 मार्च) रात्री उशिरापर्यंत ‘वर्षा’ बंगल्यावर चर्चा सुरु होती. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, हेमंत नागराळे आणि परमबीर सिंग हे उपस्थित होते. तब्बल चार तास ही बैठक सुरु होती. यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात देखील सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर आता मुंबई पोलीस आयुक्तांची बदली करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

दरम्यान, याबाबत बदली बाबतची माहिती स्वत: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

Mumbai CP: ‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांबद्दल CM निर्णय घेणार’, बदलीबाबत मोठं वक्तव्य

पाहा पोलीस प्रशासनात राज्य सरकारने नेमके काय बदल केले आहेत:

ADVERTISEMENT

  • हेमंत नगराळे हे मुंबई पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतील.

ADVERTISEMENT

  • रजनीश शेठ यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार असेल

  • संजय पांडे यांच्यावर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

  • परमबीर सिंग यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावर हटविण्यात आलं असून त्यांच्याकडे आता होमगार्डची महासंचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे

  • मुंबई पोलीस आयुक्तांची बदली होणार याचे आज सकाळीच देण्यात आले होते संकेत

    दरम्यान, आज सकाळी महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतर शिवसेनेची मंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीचे संकेत दिले होते. ‘मुंबईच्या पोलीस आयुक्तांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच निर्णय घेणार आहेत. तसा त्यांना संपूर्ण अधिकार देखील आहे.’ अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली होती. त्यानंतर अवघ्या काही तासातच परमबीर सिंग यांना आयुक्त पदावरुन हटविण्यात आल्याचं वृत्त समोर आलं.

    परमबीर सिंग यांना भोवलेलं सचिन वाझे प्रकरण नेमकं आहे तरी काय?

    25 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया या निवासस्थानाबाहेरच्या रस्त्यावर जिलेटिनच्या कांड्या असलेली एक स्कॉर्पिओ सापडली होती. या स्कॉर्पिओ प्रकरणाचे पडसाद थेट महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उठले. ती स्कॉर्पिओ मनसुख हिरेन यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. मनसुख हिरेन आणि सचिन वाझे यांच्यात व्यावसायिक हितसंबंध असल्याची बाबही समोर आली.

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विविध आरोप करत सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे दाखवून दिले. तसंच मनसुख हिरेन यांना सुरक्षा मिळावी अशीही मागणी ५ मार्चला केली. त्याच दिवशी दुपारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला.

    यानंतर आणखी आक्रमक झालेल्या फडणवीस यांनी सचिन वाझे हेच या प्रकरणात कसे गुंतले आहेत हे आणखी काही कागदपत्रे, सीडीआर यांचा हवाला देऊन विधानसभेत सांगितलं. हे संपूर्ण प्रकरण NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्याची मागणीही केली. स्कॉर्पिओचं प्रकरण हे NIA कडे तर मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडे सोपवण्यात आलं आहे. या दोन्ही तपास यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहेत.

    १३ मार्चच्या रात्री NIA ने सचिन वाझेंना अटक केली. या अटकेनंतर विविध तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात सुरू झाले आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांची बदली केली जाईल, गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागेल अशा चर्चा रंगल्या आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी मात्र हे संपूर्ण प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं आहे असं म्हटलं आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT