Covid 19: कोरोना रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ, गेल्या 24 तासात देशभरात सापडले 'एवढे' रुग्ण

Corona case 1 lakh 94 thousand: देशात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
big increase again in corona case 1 lakh 94 thousand new patients found infection rate reached 11 percent
big increase again in corona case 1 lakh 94 thousand new patients found infection rate reached 11 percent(फाइल फोटो)

Covid Cases in India: मुंबई: कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1,94,720 नवीन रुग्ण आढळले आहेत. देशातील कोरोनाचा संसर्ग दर 11.05 टक्क्यांवर गेला आहे. नवीन व्हेरिएंटचा विचार केल्यास देशात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या 4868 वर गेली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्र आणि राजस्थानमधील आहेत.

चाचणीबद्दल बोलताना, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मते, मंगळवारी भारतात कोरोना विषाणूसाठी 17,61,900 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या, कालपर्यंत एकूण 69,52,74,380 सॅम्पल टेस्ट करण्यात आल्या आहेत.

भारतात गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे 1,94,720 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 60,405 जण बरे झाले आहेत. पण देशभरात 442 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

  • एकूण रुग्ण: 3,60,70,510

  • अॅक्टिव्ह रुग्ण : 9,55,319

  • एकूण बरे झालेले रुग्ण: 3,46,30,536

  • एकूण मृत्यू: 4,84,655

  • एकूण लसीकरण: 1,53,80,08,200

  • Omicron चे रुग्ण: 4,868

महाराष्ट्रात दिवसभरात 34 हजार 424 रूग्ण पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनच्या 34 रूग्णांची नोंद

महाराष्ट्रात काल दिवसभरात 34 हजार 424 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं होत. तर दिवसभरात राज्यात 18 हजार 967 रूग्णांना घरी सोडण्यात आलं होतं. आत्तापर्यंत राज्यात एकूण 66 लाख 21 हजार 70 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 94.75 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात दिवसभरात 22 मृत्यूंची नोंद झाली होती. सध्या राज्यातील मृत्यू दर 2.2 टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 9 लाख 28 हजार 954 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 69 लाख 87 हजार 938 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्या 14 लाख 64 हजार 987 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 3032 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 34 नवे रूग्ण आढळले आहेत. आज हे सगळे रूग्ण बी. जे. वैद्यकीय महविद्यालयाने रिपोर्ट केले आहेत. यातले 25 रूग्ण पुणे मनपा, 6 रूग्ण पुणे ग्रामीण, 2 सोलापूर, 1 पनवेल असे आहेत. राज्यात आता ओमिक्रॉनचे 1281 रूग्ण झाले आहेत.

महाराष्ट्रात आज घडीला 2 लाख 21 हजार 477 सक्रिय रूग्ण आहेत. राज्यात काल 34 हजार 424 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 69 लाख 87 हजार 938 इतकी झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in