Corona : मुंबईत कोरोना रूग्णंख्येत मोठी वाढ! दिवसभरात 6347 रूग्णांची नोंद

मुंबईत दिवसभरात आज एका रूग्णाच्या मृत्यूची नोंद
Corona : मुंबईत कोरोना रूग्णंख्येत मोठी वाढ! दिवसभरात 6347 रूग्णांची नोंद

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येतही मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात 6347 रूग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 451 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात 1 रूग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दिवसभरात मुंबईत 47 हजार 978 चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 50 हजार 158 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत एकूण 16 हजार 377 मृत्यू झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्के इतका झाला आहे. मुंबईचा डबलिंग रेट 251 दिवसांवर आला आहे. मुंबईत सील करण्यात आलेल्या इमारतींची संख्या आता 157 इतकी झाली आहे. तर झोपडपट्टी आणि चाळींमधल्या कंटेन्मेंट झोनची संख्या 10 झाली आहे.

Corona : मुंबईत कोरोना रूग्णंख्येत मोठी वाढ! दिवसभरात 6347 रूग्णांची नोंद
वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर...

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहू

31 डिसेंबर- 5631 रूग्णांची नोंद

30 डिसेंबर -3671 रूग्णांची नोंद

29 डिसेंबर-2510 रूग्णांची नोंद

28 डिसेंबर - 1377 रूग्णांची नोंद

27 डिसेंबर - 809 रूग्णांची नोंद

26 डिसेंबर - 922 रूग्णांची नोंद

25 डिसेंबर-757 रूग्णांची नोंद

24 डिसेंबर-683 रूग्णांची नोंद

23 डिसेंबर- 602 रूग्णांची नोंद

22 डिसेंबर 490 रूग्णांची नोंद

21 डिसेंबर 327 रूग्णांची नोंद

21 ते 31 डिसेंबर या कालावधीत रूग्णसंख्या 327 वरून 5631 वर गेली आहे. तर आज दिवसभरात 6347 रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट आली आहे का? याची चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे मुंबईत तिसरी लाट आल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. शुक्रवारच्या तुलनेत आजचे मुंबईतले रूग्ण हे 716 ने वाढले आहेत. मुंबईसाठी ही नक्कीच चिंतेची बाब मानली जाते आहे.

Photo - India Today

मुंबई महापालिकेच्या डी वॉर्डमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की चार ते पाच दिवसात पाच इमारती सील केल्या आहेत. दूतावास अपार्टमेंटची बी विंग आणि नेपेनसी रोड येथील दर्या महलची ए विंग सील करण्यात आलेल्या इमारतींमध्ये आहेत. दूतावास अपार्टमेंटमध्ये गेल्या दोन दिवसांत 13 प्रकरणे नोंदवली गेली आहेत त्यापैकी 11 प्रकरणे बी विंगमधून आणि उर्वरित ए विंगमधून नोंदवली गेली आहेत. व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी इमारती सील केल्या जात आहेत. मंगळवारी दूतावास अपार्टमेंटमध्ये 5 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती, त्यानंतर संपूर्ण इमारतीत चाचणी घेण्यात आली आणि आणखी 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in