PUNE Lockdown: पुणेकरांसाठी मोठी बातमी, दुकानं 4 वाजेपर्यंतच सुरु; सोमवारपासून काय असणार कठोर निर्बंध?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: राज्यात मागील काही दिवसापासून कोरोनाचे (Corona) रुग्ण हे पुन्हा वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्य शासनाची चिंता वाढत आहेत. त्यातच राज्यात डेल्टा प्लसचे (Delta Plus) रुग्णही वाढू लागले आहेत. अशावेळी दुसऱ्या लाटेत राज्यात सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुण्यात (Pune) आता पुन्हा एकदा कठोर निर्बंध (Strict Restriction) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याविषयी पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे आता पुणे शहरात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार (28 जून) सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी चारपर्यंतच सुरु राहणार आहेत.

जाणून घ्या सोमवारपासून पुण्यात कोणकोणते नवे नियम लागू होणार?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील. अत्यावशयक सेवा वगळता सर्व दुकाने शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील.

  • सोमवारपासून सर्व दुकाने दुपारी चारपर्यंतच सुरु राहणार; राज्य सरकारच्या निर्देशानुसार शहरात नवी नियमावली

  • ADVERTISEMENT

  • हॉटेल दुपारी 4 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

  • ADVERTISEMENT

    Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात पुन्हा कठोर लॉकडाऊन होणार?

    • हॉटेल सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत आसनक्षमतेच्या 50 टक्के आणि दुपारी 4 नंतर तसेच शनिवार व रविवार पार्सल सेवा/घरपोच देता येतील.

    • खासगी कार्यालये दुपारी 4 पर्यंत सुरु राहणार

    • पुणे मनपा हद्दीतील खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचारी क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार आणि रविवार पूर्णतः बंद राहतील.

    • कार्यक्रमास दुपारी 4 पर्यंत परवानगी

    • सामाजिक, धार्मिक, मनोरंजन कार्यक्रमास 50 लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत परवानगी असेल. शनिवारी आणि रविवारी पूर्णतः बंद असेल.

    • लग्न समारंभ 50 तर अंत्यसंस्कारास 20 लोकांना परवानगी

    • लग्न समारंभ 50 लोकांच्या उपस्थितीत तर अंत्यसंस्कार, दशक्रिया कार्यक्रम 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी आहे.

    • ई-कॉमर्स सेवांना परवानगी

    • ई-कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्यास परवानगी राहील.

    • सायंकाळी 5 वाजेनंतर संचारबंदी

    • पुणे शहरात सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असेल तर सायंकाळी 5 नंतर संचारबंदी लागू राहील. या काळात अत्यावश्यक कारण वगळता बाहेर पडता येणार नाही.

    • PMPML 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार

    पुण्यात निर्बंध ‘जैसे थे’, १५ जुलैपर्यंत कॉलेज-शाळा बंद

    • पीएमपीएमएल बससेवा आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून उभा राहून प्रवास करण्यास परवानगी नसेल.

    • मद्य विक्रीला सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत परवानगी

    • पुणे शहरात मद्य विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवार होम डिलिव्हरी सुविधा उपलब्ध असेल.

    कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने आता पुण्यासह नागपूर, अकोलामध्ये निर्बंध पुन्हा कठोर करण्याचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

      follow whatsapp

      ADVERTISEMENT