Big News! केंद्रीय मंत्री Narayan Rane पोलिसांनी केली अटक

Big News! केंद्रीय मंत्री Narayan Rane पोलिसांनी केली अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कारवाई

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. काही वेळापूर्वीच नारायण राणे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला. त्यानंतर नारायण राणे यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरही वाढली होती. त्यानंतर आता पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे. ते आपल्या कारमधून बसून पोलिसांसोबत रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर ही कारवाई अखेर करण्यात आली आहे. नारायण राणे यांची तब्बेत बिघडली आहे मात्र आता त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव आहे तेच मुख्यमंत्र्यांना माहित नाही असं म्हणत नारायण राणे यांनी ते वादग्रस्त शब्द वापरले होते. गेल्या चार दिवसांपासून जनआशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. यामध्ये नारायण राणे हे सातत्याने शिवसेनेवर टीका केली आहे.

नारायण राणे यांनी सुरू केलेली ही जनआशीर्वाद यात्रा हा संघर्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे विरूद्ध नारायण राणे असा एक, शिवसेना विरूद्ध राणे असा दुसरा, तिसरा म्हणजे राज्य विरूद्ध केंद्र असे तीन पदर या संघर्षाला आहे. वरूण सरदेसाई यांचं मैदानात उतरून नारायण राणेंच्या विरोधात गेले आहेत त्यामुळे इतके दिवस अनुल्लेखाने मारा हे धोरण आता पुरे इथवर येऊन ठेपलं आहे असं दिसतं आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्यात सध्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नेण्यात आलं आहे. आधी गोळवली या ठिकाणी आधी नारायण राणे यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर आता नारायण राणे यांना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

काय आहे प्रकरण?

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक मुद्यांवरुन टीका केली. सुरुवातीला नारायण राणेंनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन यावरुन बरीच मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली.

'या माणसाकडे कोणातीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.' असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in