Crime: बहिणीच्या प्रियकराला संपवण्यासाठी भावाने 'फिल्मी स्टाईल'ने दिली हत्येची सुपारी

Crime: बहिणीच्या प्रियकराला संपवण्यासाठी भावाने 'फिल्मी स्टाईल'ने दिली हत्येची सुपारी
bihar crime sister boy friend brother murder filmy style(प्रातिनिधिक फोटो)

रोहतास (बिहार): बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील विक्रमगंजमध्ये एक अशी घटना घडली आहे की, जी एखाद्या सिनेमाची स्टोरी वाटावी इतकी फिल्मी आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांनी खुलासा केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या संपूर्ण कथेत बहीण ही आपल्या प्रियकराच्या प्रेमात वेडी झाली आहे. परंतु या सगळ्यात तिचा भाऊ मात्र खलनायक ठरला आहे.

तरुणीचा भाऊ हा तिच्या प्रियकराला भेटू देण्यास अजिबात तयार नव्हता. सिनेमातील एखाद्या खलनायकाप्रमाणेच तो आपल्या बहिणीशी वागत होता. एवढंच नव्हे तर बहिणीच्या प्रियकराला कायमच संपविण्यासाठी त्याने लाखो रुपयांची सुपारी देखील दिली होती.

...म्हणून प्रिन्सने बहिणीच्या प्रियकराची दिली सुपारी!

या सगळ्या घटनेची सुरुवात ही प्रेमप्रकरणातून झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिन्सच्या बहिणीसोबत हिमांशू नावाच्या मुलाचे प्रेमसंबंध होते. यामुळे प्रिन्स या सगळ्याबाबत खूपच नाराज होता. याबाबत त्याने बहिणीकडे नाराजी देखील व्यक्त केली होती. पण बहिणीला प्रियकरच सर्वस्व वाटत असल्याने तिने भावाच्या नाराजीकडे दुर्लक्ष केलं.

बहिण आपलं ऐकत नाही आणि प्रियकराला सोडण्यास देखील तयार नसल्याने संतापलेल्या प्रिन्सने थेट बहिणीच्या प्रियकराची सुपारी नितीश आणि रॉकी नावाच्या दोघांना दिली. यासाठी त्याने त्यांना तब्बल चार लाख रुपये दिले. सुपारी घेतल्यानंतर नितीश आणि रॉकी हे प्रिन्सच्या बहिणीचा प्रियकर हिमांशू याचा शोध घेऊ लागले.

हिमांशूला संपविण्यासाठी मारेकरी पोहोचले घरी, पण..

6 जानेवारीला नितीश आणि रॉकी हे हिमांशूला संपविण्यासाठी थेट त्याच्या घरी पोहोचले. जिथे हिमांशूसोबत त्याचा मित्र राहुलही हजर होता. रात्री उशिरा नितीश आणि रॉकीने हिमांशूवर गोळीबार केला. हिमांशूला वाचवण्यासाठी राहुल मध्ये आला. त्यामुळे गोळी थेट राहुलच्या डोक्यातच घुसली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मारेकऱ्यांनी हिमांशूवर चाकूने हल्ला केला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

राहुलची हत्या आणि हिंमाशूवर चाकू हल्ला केल्यानंतर दोन्ही मारेकरी आपली दुचाकी सोडून फरार झाले. दरम्यान, स्थानिकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली. ज्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकी जप्त केली.

पोलिसांनी प्रिन्सला केली अटक

त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु केला. यावेळी प्रेयसीचा भावानेचा सुपारी दिल्याचं समोर आलं. ज्यानंतर पोलिसांनी प्रिन्सला दालमियानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रयाग बिगहा गावातून अटक केली. त्यांनी त्याच्याकडून देशी बनावटीचे हत्यार देखील जप्त केले. चौकशीत राजकुमारने आपल्या बहिणीच्या प्रियकराच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचे कबूल केले.

प्रिन्सने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी नितीशला कैमूर आणि रॉकीला दुर्गावती पोलिस हद्दीतील मोहनिया येथून अटक केली.

रविवारी पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला. मीडियाला माहिती देताना एसएचओ मनोज कुमार यांनी सांगितले की, संपूर्ण हत्येचे प्रकरण एका प्रेमप्रकरणाशी संबंधित आहे. प्रियकर हिमांशू राहुलसोबत राहत होता आणि त्याच्याशी चांगली मैत्री होती.

मोबाइलने उघडले खुनाचे गुपित

प्रिन्सने हिमांशूची हत्या करण्यासाठी शस्त्रांसह नितीश आणि रॉकीला चार लाखांची सुपारी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नामांकित गुन्हेगारांच्या अटकेसाठी पोलिसांनी प्रथम त्यांचे मोबाईल नंबर सर्विलन्सवर ठेवले. त्यानंतर कॉल डिटेल्स काढण्यात आले. ज्यामध्ये प्रिन्सचे सलग दोन लोकांशी झालेले संभाषण झाल्याचे समोर आले होते.

bihar crime sister boy friend brother murder filmy style
Crime : बहिणीची हत्या करुन मृतदेह ठेवला घरात, सोसायटीत दुर्गंधी पसरल्यामुळे झाला उलगडा

त्या संभाषणाची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये हत्येसाठी चार लाख रुपये दिल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल चौकशी केली आणि प्रिन्सला अटक केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in