विनयभंगप्रकरणी BJP नगरसेवकाला अटक, खुद्द गृहमंत्र्यांची माहिती - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / विनयभंगप्रकरणी BJP नगरसेवकाला अटक, खुद्द गृहमंत्र्यांची माहिती
बातम्या

विनयभंगप्रकरणी BJP नगरसेवकाला अटक, खुद्द गृहमंत्र्यांची माहिती

मुंबई: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना एका महिलेच्या घरात घुसून तिच्यावर अतिप्रसंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या घटनेची माहिती स्वत: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पाहा याप्रकरणी अनिल देशमुखांनी नेमकी काय दिली माहिती

भाजपचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी काल (3 मार्च) रात्री 12.40 च्या सुमारास एका महिलेच्या घरात घुसून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. याचप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. यावेळी नितीन तेलवणे त्याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४५२, ३५४, ३५४-अ, ५०६ या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (bjp corporator from murbad in thane district arrested for allegedly molesting woman)

जळगाव महिला वसतीगृह प्रकरणी काय म्हणाले गृहमंत्री

दरम्यान, जळगाव येथील महिला वसतीगृहात तरुणींना कपडे काढून पोलिसांनी त्यांना नृत्य करण्यास भाग पाडलं असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी विधानसभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला होता. मात्र, याप्रकरणी आज (4 मार्च) गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माहिती देताना असं म्हटलं की, पोलिसांवरील आरोपात काहीही तथ्य नाही.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी माझी व माझ्या समाजाची बदनामी-संजय राठोड

‘महिलांचं वसतीगृह असल्याने तिथे एकही पोलीस कर्मचारी आत जाऊ शकत नाही. तेथील रजिस्टरमध्ये देखील एकही पोलीस अधिकारी आत गेल्याची नोंद नाही. त्यामुळे पोलिसांवर जे आरोप करण्यात येत आहे त्यात काहीही तथ्य नाही. तशा प्रकारचा अहवाल महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दिला आहे.’ अशी माहिती अनिल देशमुखांनी दिली

सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरु असून विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने वेगवेगळ्या स्वरुपाचे आरोप केले जात आहे. तसेच पूजा चव्हाण प्रकरणानंतर सरकारला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. राज्यात महिला सुरक्षित नसल्याचं म्हणत भाजपने गेल्या काही दिवसात सातत्याने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. या सगळ्या दरम्यान, खुद्द गृहमंत्र्याने भाजपच्या नगरसेवकाला विनयभंगप्रकरणी अटक केल्याची माहिती दिल्यानंतर आता यावरुन अधिक राजकारण तापण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

11 + 12 =

भर कार्यक्रमात कपिल शर्मा पडला आमिर खानच्या पाया प्रसिद्ध गायिकेचं विमानात लाजिरवाण कृत्य, चाहत्यांकडून संताप व्यक्त ‘माही भाई तुमच्यासाठी काहीपण..’ जाडेजाचं धोनीसाठी मनाला भिडणारं ट्विट! CSK च्या दणदणीत विजयानंतर जाडेजाची पत्नी भावूक, मारली घट्ट मिठी! नाच रे मोरा… बाबा बागेश्वरचा मोरासोबत डान्स, Video पाहिलात का? IPL 2023 च्या अंतिम सामन्यात महिलेची पोलिसाला मारहाण, Video व्हायरल Rutuja Bagwe : ही आपली मराठमोळी अभिनेत्री ऋतुजाच आहे बरं! Virgin Mojito चे नाव ‘व्हर्जिन’ का? ‘ही’ आहे त्यामागची कहाणी बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींनी नंतर करिअरच सोडलं, कारण… IPL 2023 : झिवाची प्रार्थना देवाने पुन्हा ऐकली, CSK च्या विजयानंतर Photo व्हायरल! Kriti Sanon: सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री नाशिकच्या काळाराम मंदिरात ‘या’ चुका कराल तर, कधीच वजन कमी होणार नाही! समजून घ्या Paresh Rawal : बॉसच्या मुलीवरच जडला जीव, 12 वर्ष डेटिंग नंतर…; अभिनेत्याची भन्नाट लव्हस्टोरी ‘वीर सावरकरां’च्या भूमिकेसाठी रणदीपने घटवलं 26 किलो वजन, केलं कडक डाएट! आमिर खानच्या मुलीचा रिक्षातून प्रवास, साधेपणा दाखवूनही ट्रोल बिकिनीवरून टोकलं, नोकरी सोडून बनली अडल्ट मॉडेल अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला! Karishma Kappor चा फिटनेस फ्रिक डाएट, 48 व्या वर्षीही कमालीची फिगर कधी अंबानी कुटुंब, तर कधी बॉलिवूड स्टार्ससोबत; सगळीकडे दिसणारा ‘ओरी’ कोण? महिलेने सांगितले श्रीमंत पतीचे तोटे; यूजर्स म्हणाले, ‘जास्त पैसे असतील तर..’