Goa Result : मुख्यमंत्रीपदाची कमान प्रमोद सावंतांच्या हातात नाही? फडणवीसांचं सूचक विधान

मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेणार, तीन अपक्षांचा भाजपला पाठींबा
Goa Result : मुख्यमंत्रीपदाची कमान प्रमोद सावंतांच्या हातात नाही? फडणवीसांचं सूचक विधान

गोवा विधानसभेत त्रिशंकु परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. परंतू हे सर्व अंदाज खोटे ठरवत गोव्याने अपक्षांच्या साथीने पुन्हा एकदा सत्तास्थापनेच्या मार्गावर आपलं पहिलं पाऊल टाकलं आहे. परंतू पुढील पाच वर्षांसाठी गोव्याची जबाबदारी प्रमोद सावंतांकडे जाईल याची शक्यता कमी दिसत आहे.

आपला सत्ता स्थापन करण्याची घाई नाहीये, त्यामुळे आम्ही लगेच राज्यपालांची भेट घेणार नाही असं विधान फ़डणवीसांनी केल्यामुळे गोव्यात मुख्यमंत्रीपदासाठी ड्रामा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Goa Result : मुख्यमंत्रीपदाची कमान प्रमोद सावंतांच्या हातात नाही? फडणवीसांचं सूचक विधान
Goa Election: गोव्यातील भाजपच्या विजयानंतर फडणवीसांनी दिली प्रचंड मोठी बातमी...

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावावर अद्याप एकमत झालेलं नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी कोणत्या नेत्याकडे जाणार याचा निर्णय भाजपचं केंद्रीय नेतृत्व घेणार आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांनी प्रमोद सावंत यांच्या नावाला पसंती दर्शवली असली तरीही सावंत यांच्या नावावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नसल्याचं कळतंय. गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आता केंद्रीय नेतृत्व घेणार असून विश्वजीत राणेंसारखे अनेक मोठे नेते आपली दावेदारी सांगू शकतात असं कळतंय.

Goa Result : मुख्यमंत्रीपदाची कमान प्रमोद सावंतांच्या हातात नाही? फडणवीसांचं सूचक विधान
गोव्याच्या 'राज ठाकरें'चा वाघ आता विधानसभेत, म्हणाले तो गरजणार...

देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या विजयाचं श्रेय हे कार्यकर्ते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं. आमच्या सरकारने गोव्याच्या विकासासाठी घेतलेल्या सकारात्मक आणि विकासाच्या पावलांमुळे राज्यातील जनेतेने आमच्यावर विश्वास ठेवल्याचं सांगितलं. महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षासोबत तीन अपक्षांनीही भाजपला पाठींबा दर्शवला असल्यामुळे गोव्यात पुढील पाच वर्ष भाजपचं सरकार येणार हे आता स्पष्ट झालं आहे.

Goa Result : मुख्यमंत्रीपदाची कमान प्रमोद सावंतांच्या हातात नाही? फडणवीसांचं सूचक विधान
शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा मतदारांची NOTA ला पसंती, गोव्यात आघाडीची खिचडी शिजलीच नाही

पणजी मतदारसंघात उत्पल पर्रिकर यांना बाबुश मोन्सेरात यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. याबद्दल बोलत असताना फडणवीसांनी बाबुश यांच्या विजयाचा आनंद असला तरीही उत्पल यांच्या पराभवामुळे मला आनंद झालेला नसल्याचं सांगितलं. पर्रिकर परिवार हा भाजपचा परिवार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे भाजप मुख्यमंत्रीपदासाठी कोणाचं नाव पुढे करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Goa Result : मुख्यमंत्रीपदाची कमान प्रमोद सावंतांच्या हातात नाही? फडणवीसांचं सूचक विधान
वाळपोई विश्वजीत राणेंचीच! कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in