'भाजप आम्हाला फार लांब नाही'; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला सूचक इशारा

आघाडीच करायची असेल तर कोणाशीही हात मिळवता येतो... आव्हाडांचा इशारा
'भाजप आम्हाला फार लांब नाही'; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला सूचक इशारा

-निलेश पाटील, नवी मुंबई

महाविकास आघाडीतील पक्ष आपण एकत्र असल्याचं दाखवत असले तरीही अंतर्गत कुरबुरी आता समोर यायला लागल्या आहेत. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत २०२४ ला हेच सरकार येणार असं शरद पवार बोलल्याचं सांगितलं.

परंतू याच कार्यक्रमात बोलत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांवरुन शिवसेनेला कानपिचक्या देत आव्हाडांनी भाजप आम्हाला फार लांब नाही असं म्हणत सूचक इशारा दिला आहे.

'भाजप आम्हाला फार लांब नाही'; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला सूचक इशारा
पवार साहेब खासगीत बोलले, 2024 ला हेच सरकार येईल आणि मी उद्धवलाच मुख्यमंत्री करेन: आव्हाड

आगामी काळात मुंबई महापालिकेसह नवी मुंबई, ठाणे अशा महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुकांमध्ये वॉर्ड रचनेवरुन होत असलेल्या राजकारणावर आव्हाडांनी शिवसेनेला थेट लक्ष्य केलं. शिवसेना आपल्याला हवं तसे वॉर्ड तयार करत असल्याचा धक्कादायक आरोप आव्हाडांनी केला.

'भाजप आम्हाला फार लांब नाही'; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला सूचक इशारा
राहुल गांधींना त्यांच्या पक्षात काम करू दिलं जात नाही असं माझं आकलन-संजय राऊत

"मी निवडणुक आयोगाला हे सांगू इच्छितो की इथल्या राजकीय नेत्यांना भेटून नंतर मग वॉर्ड ठरवले जात असतील तर हा लोकशाहीचा खून आहे. तुम्ही आतापासून वॉर्ड रचना करुन जर कोणाला कसं पाडायचं आणि आपला वॉर्ड कसा सुरक्षीत करायचा हे गणित लावणार असाल तर निवडणुक घेताच कशाला? जर याच्यात नोकरशाहीचा समावेश असेल तर निवडणुक आयोगाने याचा वेगळा विचार करावा. वॉर्ड रचनेचं काम निवडणुक आयोगाने स्वतंत्रपणे करावं."

इकडन आम्ही कच्चा माल पाठवायचा आणि तिकडे तुम्ही पक्का करु असं म्हणत असाल तर तुम्ही तसं काहीही करत नाही. जसे मॅप आले आहेत तसेच प्रिंट करुन पब्लिश कराल. हे आम्ही मागच्यावेळेच ठाणे महापालिकेत पाहिलं. तेव्हा आम्ही आणि शिवसेना बरोबर नव्हतो. शिवसेना आपल्याला हवे तसे वॉर्ड पाडून घेते हे आम्ही डोळ्यांनी पाहिलं आहे असंही आव्हाड म्हणाले.

यापुढे बोलत असताना आव्हाडांनी थेट शिवसेनेवर निशाणा साधला. "जर प्रत्येक पक्षाला आपली बेडकी मोठी झाली असं वाटत असेल तर ते स्वप्नातच...मी आजही मनापासून सांगतो मी आघाडीच्या बाजूने आहे. शिवसेनेला मोठा भाऊ समजून ठाणे जिल्ह्यात आघाडी करा असं मी एकनाथ शिंदेला सांगितलं आहे. पण माझे पाय खेचायचे की तुझे पाय खेचायचे या नादात आपण राहिलो तर हातात असलेला जिल्हा आपण भाजपला आंदण देऊ हे स्पष्टपणे सांगतो. भाजप आम्हाला फार लांब नाही. आघाडीच करायची असेल तर आम्हाला कोणाशीही हात मिळवता येतील".

'भाजप आम्हाला फार लांब नाही'; जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला सूचक इशारा
सुप्रिया सुळे, आव्हाड म्हणतात; 25 वर्ष ठाकरे सरकार चालेल.. पण याच प्रश्नावर अजित पवार का संतापले?

पोटात एक आणि ओठात एक हे चालणार नाही. एकनाथ शिंदेंच्या मनात आघाडी करायचं आहे हे मी त्यांच्या वागण्या-बोलण्यावरुन सांगू शकतो, पण आजुबाजूच्या लोकांच्या मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही असं म्हणत आव्हाडांनी सेनेला कानपिचक्या देत इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in