मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या दिवशीच शिमगा केला-चंद्रकांत पाटील

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसऱ्याच्या दिवशीच शिमगा केला. ड्रग्ज सापडत आहेत त्याचं काही गांभीर्य नाही. शक्ती कायदा अद्यापही प्रलंबित का? मुख्यमंत्री म्हणून बोलत असताना राज्याच्या हिताच्या अपेक्षित होत्या असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

‘दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख अशी दोन्ही पदं भुषवणारे उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकल्यावर शिमगा लांब आहे हे लक्षात न आल्याने त्यांनी दसऱ्यालाच शिमगा करून टाकला. संपूर्ण भाषण अतिशय लक्षपूर्वक ऐकलं. ते शिवसेना पक्षप्रमुख म्हणून ते बोलत जरी असले तरीही महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना मुख्यमंत्री म्हणून हात घालतील अशी अपेक्षा होती’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वीर सावरकर आणि महात्मा गांधी यांची नावं घेण्याची कुणाचीही लायकी नाही-उद्धव ठाकरे

‘महाराष्ट्रात महिला अत्याचार वाढत चालले आहेत, त्यामध्ये नेमकं काय करणार आहेत? कायदा पेडिंग आहे. शक्ती कायदा लवकरात लवकर करून टाका. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा आक्रोश सुरू आहे. त्यावर तुम्ही काय करणार आहात? दहा हजार कोटींची फोड मांडा की.. रस्ते दुरूस्त करणं, धरणं सुरक्षित करणं, यासाठी तुम्ही पैसे दिले असतील तर शेतकऱ्यांचा फायदा काय? शेतकऱ्यांना तुम्ही दहा हजार रूपये हेक्टर दिले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळात 20400 रूपये हेक्टरी आणि बागायतीला 54000 रूपये हेक्टरी दिले होते. ज्याला तुम्ही 25 हजार दिलेत, त्यांना देवेंद्रजींनी 75 हजार रूपये हेक्टर दिले आहेत.’ असाही दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात दोन वादळं झाली, अतिवृष्टी झाली, महिलांवर अत्याचार झाला. मोठ्या प्रकरणात समोर येणारं ड्रग्ज प्रकरण, त्याबाबतही तुम्ही चिमूटभर गांजा असा उल्लेख केला. याचा अर्थ गांभीर्यच नाही. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी कदाचित लवकर शिमगा आला असावा असं वाटल्याने केंद्र सरकार आणि भाजपच्या नावाने शिमगा करता येईल तेवढा शिमगा उद्धव ठाकरेंनी केला’ असाही टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT