मोदीजींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, काँग्रेसनेच माफी मागावी-फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. काँग्रेसने देशाचा बट्ट्याबोळ केला आहे. काँग्रेसनेच देशाची माफी मागितली पाहिजे असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबईसह राज्यात एकीकडे काँग्रेस आंदोलन करत असताना दुसरीकडे राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आशिष शेलार, प्रसाद लाड, कृपाशंकर सिंग, मंगलप्रसाद लोढा उपस्थित होते. फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहोचले असताना काही भाजपा कार्यकर्तेही त्यांच्या भेटीसाठी आले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी फडणवीसांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस आप आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाले फडणवीस?

कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती काँग्रेसने या देशाचं वाट्टोळं केल्याबद्दल मागावी. त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही. असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तात्पुरतं आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. ‘महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, शिवरायांचा, विचारांचा अपमान नरेंद्र मोदींनी केला असून भाजपने त्यांना पाठिंबा दिला असून आम्ही त्याचा निषेध करतो. भाजपनेच लोकांना रस्त्यावर आणले असून भाडोत्री लोकं उतरवली आहेत. त्यांनीच रस्ता जाम केला. भाजपची भूमिका राष्ट्रद्रोही असल्याचं यानिमित्ताने स्पष्ट झालं आहे. त्यांच्यामुळे मुंबईकरांना आज त्रास सहन करावा लागत आहे. आजचं आंदोलन आम्ही तात्पुरतं मागे घेत आहोत. पण हे आंदोलन सर्व खासदारांच्या घरासमोर सुरु ठेवण्याची भूमिका स्पष्ट आहे’ असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

ADVERTISEMENT

नाना पटोले म्हणाले, आमचं आंदोलन झालं आहे. आमच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. पण भाजपच्या लोकांनी आज मुंबईकरांना अडवलं. आम्हालाही गुंडगिरी करता येते, पण ही आमची संस्कृती नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT