TET Exam Scam: ‘…तरच ‘या’ घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील’, फडणवीसांचा नेमका निशाणा कोणावर?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे यांना परीक्षा घोटाळा प्रकरणी अटक केल्यानंतर आता वेगवेगळी माहिती समोर येत आहे. याच मुद्द्यावरुन राज्याचे विरोधी पक्ष नेते यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहत. ‘सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील.’ असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट सत्ताधाऱ्यांकडेच याबाबत बोट दाखवलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

पाहा परीक्षा घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी नेमकी काय मागणी केली:

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी या संपूर्ण परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले.’

‘आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत.’

ADVERTISEMENT

‘या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी! सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा.’ अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केली आहे.

ADVERTISEMENT

आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांची ही मागणी मान्य करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

TET Exam Scam : पैसे, सोनं, एफडी… तुकाराम सुपेंच्या घरात सापडलं लाखो रुपयांचं घबाड!

टीईटी परीक्षा घोटाळा नेमका आहे तरी काय?

म्हाडा पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याच्यासह एजंट संतोष हरकळ आणि अंकुश हरकळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यांची चौकशी करत असताना त्यांनी 2019-2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता (TET) परीक्षेत विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन निकाल बदलल्याचं सांगितलं.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागातील सल्लागार अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने हे केल्याचं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर पोलिसांनी 16 डिसेंबर रोजी तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांची सायबर सेल पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली. त्यांनी घोटाळ्याची कबुली दिली.

परीक्षा घेण्याची जबाबदारी असलेल्या जी.ए. सॉफ्टवेअर्स कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख याला हाताशी धरून त्याच्यासोबत असलेल्या संतोष हरकळ व अंकुश हरकळ (रा. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) या एजंटच्या मदतीने परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची माहिती मिळवल्याचं त्यांनी कबूल केलं.

TET Exam : राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षेत पास करण्याचं आश्वासन देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी 50 ते 1 लाख अशा रकमा घेतल्या. यामाध्यमातून जवळपास 4 कोटी 20 लाख रुपये जमा झाले होते. हे पैसे आरोपींनी आपआपसात वाटून घेतले.

यात तुकाराम सुपे यांनी 1.70 कोटी, प्रितीश देशमुख 1.25 कोटी, अभिषेक सावरीकर 1.25 कोटी घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान तुकाराम सुपे आणि अभिषेक सावरीकर यांनी गुन्ह्याची कबुली देताना हे सांगितलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT