'उद्धव ठाकरे, शरद पवारांनी हिंमत असेल तर अडवून दाखवावं'

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिलं आव्हान
'उद्धव ठाकरे, शरद पवारांनी हिंमत असेल तर अडवून दाखवावं'
शरद पवार आणि उद्धव ठाकरे फोटो-इंडिया टुडे

मला कोणत्याही बंदीची पर्वा नाही. हिंमत असेल तर मला उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी अडवून दाखवावं असं म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट सरकारला आव्हान दिलं आहे. किरीट सोमय्या हे साताऱ्याहून कोल्हापूरकडे जात असताना उंब्रज ता.कराड येथे  भाजपचे पदाधिकारी यांनी सोमय्या यांचे स्वागत केले.

सोमय्या पुढे म्हणाले, 'कोल्हापूर येथे आंबामाताचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन, भ्रष्टाचाराच्या राक्षसाचा वध करण्यासाठी अंबामातेने शक्ती द्यावी अशी प्रार्थना करणार आहे. तसेच मला घालण्यात आलेल्या बंदीला मी भीक घालत नाही. मी त्यांना चॅलेंज केले होते की,   ठाकरे सरकार आणि पवारसाहेब यांनी हिंमत असेल तर मला अडवून दाखवावे. बंदी असते की नाही हे सरकारला माहित आहे, जनता किरीट सोमय्या यांच्या पाठिमागे आहे. असे मत  व्यक्त करीत सोमय्या कोल्हापूर कडे रवाना झाले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे
Kirit Somaiya: 'किरीट सोमय्या तालिबानी आहेत की दहशतवादी', दरेकर संतापले
भाजप नेते किरीट सोमय्या. (संग्रहित छायाचित्र)
भाजप नेते किरीट सोमय्या. (संग्रहित छायाचित्र)Twitter

किरीट सोमय्या यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने उंब्रज पोलिस यासह शीघ्र कृतीदलाचे पोलिस पथक तैनात करण्यात आले होते. तसेच ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.

सोमवारी काय म्हणाले होते सोमय्या?

सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मी कोल्हापूरला अंबेमातेच्या दर्शनासाठी जात आहे. कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू शक्तीची माता आहे. तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता. अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करणार की भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे
Kirit Somaiya यांनी आरोप केलेले हसन मुश्रीफ आहेत शरद पवारांचे खंदे समर्थक, जाणून घ्या त्यांच्याबद्दल!

त्यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला मागच्या वेळी पोलिसांनी कुठली नोटीस दिली आहे का? त्यावर सोमय्या म्हणाले की आता मी त्यांना नोटीस दिली आहे. मी शरद पवारांना नोटीस दिली, मी उद्धव ठाकरेंना नोटीस दिली. मी कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांना सांगितंल, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की, तुमच्यात हिंमत असेल तर मला थांबवून दाखवा. आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिला होता.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in