BJP नेत्याकडून राणेंची थेट संभाजी महाराजांसोबत तुलना, शिवसेनेकडून पोलिसात तक्रार

BJP leader compared Rane to Sambhaji Maharaj: भाजप नेते प्रमोद जठार यांनी नारायण राणेंची थेट संभाजी महाराजांशी तुलना केल्याने त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
BJP नेत्याकडून राणेंची थेट संभाजी महाराजांसोबत तुलना, शिवसेनेकडून पोलिसात तक्रार
BJP leader compared Rane directly with Sambhaji Maharaj

राकेश गुडेकर, रत्नागिरी

रत्नागिरीत भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. कारण राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी माजी आमदार तसेच भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेचे कोकण प्रमुख प्रमोद जठार यांच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात तक्रार सादर केली आहे. प्रमोद जठार यांनी नारायण राणेंची तुलना ही थेट छत्रपती संभाजी महाराजांशी केली आहे. त्यांच्या याच वक्तव्याबद्दल आमदार राजन साळवी यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

आमदार राजन साळवी यांनी तक्रारीत काय म्हटलं आहे? 

'छत्रपती संभाजी महाराज हे आमच्यासाठी अत्यंत पूज्यनीय असून ते आम्हाला देवासमान आहेत. छत्रपती संभाजी महाराजांविषयीच्या आमच्या भावना अत्यंत पवित्र आहेत.' 

'प्रमोद शांताराम जठार यांनी हेतुतः व जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांची तुलना नारायण तातू राणे यांच्या बरोबर केली आहे. नारायण तातू राणे हे अनेक फौजदारी केसमध्ये आरोपी आहेत. त्यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना करणे हे अत्यंत निंदनिय कृत्य आहे. प्रमोद जठार यांनी 24 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी महाराजांना सुध्दा याच संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेबाचे राज्य संपले होते" असे वक्तव्य केलेले आहे.'

'असे वक्तव्य करण्यामागे नारायण राणे हे सुध्दा छत्रपती संभाजी महाराज आहेत आणि ठाकरे सरकार हे औरंगजेबाचे राज्य आहे असा प्रमोद जठार यांच्या वक्तव्याचा हेतू आहे. अशा प्रकारे छत्रपती संभाजी महाराज यांची तुलना ही फौजदारी खटल्यातील आरोपी असलेल्या नारायण राणें बरोबर करुन प्रमोद शांताराम जठार यांनी आमच्या भावना दुखावल्या आहेत.'

'श्री. जठार यांचे सदरहू वक्तव्य अनेक सोशल मीडिया, फेसबुक,  व्हॉटस्अॅप, इलेक्टॉनिक मीडियामध्ये प्रसिध्द झाले आहे. सबब तमाम जनतेमध्ये विशेषतः छत्रपती संभाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या तक्रारदार यांच्या गटांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजामध्ये असंतोष पसरला आहे. सदरचे जठार यांचे वक्तव्य हे चिथावणीखोर वक्तव्य असून सदरहू चिथावणीखोर वक्तव्यामुळे तक्रारदार व त्यांचे अनुयायी आणि नारायण राणे व जठार समर्थकांमध्ये व्देश, शत्रुत्व भावना पसरली असून परस्पर गटांमध्ये वाईट भावनांचा उद्रेक झालेला आहे.'

'त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. सदरहू जठार यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे संपूर्ण जिल्हयात वाईट परिणाम व पडसाद उमटले आहेत व दोन गटांमध्ये अत्यंत शत्रुत्व निर्माण होऊन त्याला हिंसक वळण लागणारे आहे.'

BJP leader compared Rane directly with Sambhaji Maharaj
Narayan Rane: ठाकरे सरकार सिंधुदुर्गातील 'त्या' फाइल पुन्हा ओपन करणार?

त्यामुळे दि. 24 ऑगस्ट रोजी प्रमोद शांताराम जठार यांनी केलेले चिथावणीखोर कृत्य व वक्तव्य हे भारतीय दंड विधान संहिताचे कलम 153 ब, 153 (1) ( क ), 500, 505 (2) प्रमाणे गुन्हयाचे कृत्य आहे.'

अशी तक्रार आमदार राजन साळवी यांनी केली आहे. याचप्रकरणी त्यांनी प्रमोद जठार यांच्यावर चिथावणीखोर कृत्यांसाठी व वक्तव्यासाठी आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

दरम्यान, आता याप्रकरणी रत्नागिरी पोलीस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in