'अरे एकने आम्हाला काय फरक पडतो?, आमचे तर 303 आहेत', भाजपच्या पराभवावर राणेंची प्रतिक्रिया

'अरे एकने आम्हाला काय फरक पडतो?, आमचे तर 303 आहेत', भाजपच्या पराभवावर राणेंची प्रतिक्रिया
bjp minister narayan rane criticized shivsena kalaben delkar won dadra nagar haveli loksabha bypoll

मुंबई: भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना ऐन दिवाळीत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. यावेळी त्यांनी दादरा-नगर हवेलीच्या पराभवाबाबत बोलताना थेट असं म्हटलं आहे की, 'एकाने आम्हाला काय फरक पडतो. आमचे तर 303 आहेत. आम्ही शिवसेनेला गृहीतही धरत नाही.' असं म्हणत नारायण राणे यांनी दादरा-हवेलीतील पराभव फार काही मोठा नसल्याचं म्हटलं आहे.

पाहा नारायण राणे नेमकं काय म्हणाले:

'अरे एकने आम्हाला काय फरक पडतो? त्या संजय राऊतला कळतं तरी काय.. हे पराभव झाला म्हणून आम्ही भाव कमी केले.. काय संबंध आहे? काही बोलायचं. अरे आम्ही काय अल्पमतात आलोय का तिकडे? 303 आहेत. पुढे आहे म्हणा.. तुमचं अजून स्वत:चं धनुष्यबाण नाही तिथे पोहचलंय. तिथे बॅट पोहचली आहे. आम्ही यांना गृहीतही धरत नाही.'

'एकाने जर पंतप्रधान होणार असतील तर पाहायला नको होतं. मग एवढे मतदान का घ्यावे लागले असते. संजय राऊत एकतर काही तरी सरकला. मला तर वाटतंय सरकरलाय. एका माणसामुळे सत्ता बदलणार?'

'अरे यांना महापालिका चालवता येत नाही. बेस्ट चालवता येत नाही. तर सरकार काय चालवणार. त्यामुळे हे महाराष्ट्राचा खेळखंडोबा करणार. एक जिंकला तर म्हणे महाराष्ट्र जिंकला. शिवसेनेचं नाव घ्या ना. महाराष्ट्रावर कशाला ढकलता.' अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

'डेलकर भाजपमध्ये आल्या तर तेव्हा बोंबलू नका'

'दादरा नगर-हवेलीमध्ये यापूर्वी मोहनभाई डेलकर हे सात वेळा निवडून आले होते. आता त्यांची पत्नी निवडून आली. यामध्ये शिवसेनेचा कोणताही वाटा नाही. तिथे शिवसेनेचा साधा शाखाप्रमुख देखील नाही. पण निवडणूक जिंकल्यानंतर श्रेय घेण्यासाठी शिवसेना सर्वात पुढे नाचत आहे. काही काळाने कलाबेन डेलकर भाजपमध्ये येतील तेव्हा शिवसेनेने बोंबलू नका.'

'दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच'

'आम्ही 303 पेक्षा जास्त आहोत. तुम्ही एकने काय धडक मारणार? दिल्लीला धडक मारायला आल्यावर डोकं जागेवर राहणार नाही. संजय राऊत डोक्याविना दिसतील. दुसऱ्यांच्या मुलांचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहेच. डेलकर निवडून आल्यावर आम्हाला मोठं यश आलं. आम्ही दिल्ली काबीज करणार, अशा गोष्टी संजय राऊतांनी लिहिल्या. लिखाण करताना त्यांना भान राहत नाही. रात्री जे करायचं ते दिवसा करत असल्याने राऊतांना भान राहत नाही वाटतं.' अशा शब्दात नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in