‘लघुशंकेनं धरणाची…’, ‘टिल्ल्या लोक’वरून अजित पवारांवर राणेंचा पलटवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नितेश राणेंनी (Nitesh Rane) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP President) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली. त्याबद्दल अजित पवारांना (Ajit Pawar) प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी उंचीचा उल्लेख करत खिल्ली उडवली. याच विधानावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जुन्या वादग्रस्त विधानावर (controversial Statement) बोट ठेवत पवारांवर पलटवार केलाय.

झालं असं की छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक आहेत, धर्मवीर नव्हेत, अशी भूमिका अजित पवारांनी मांडली. त्यावरून भाजपनं आंदोलन केलं आणि विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही केली.

भाजपच्या आंदोलनानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. याच पत्रकार परिषदेत त्यांना आमदार नितेश राणेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘टिल्ल्या लोकांनी असलं काही…’, अजित पवारांकडून नितेश राणेंची हेटाळणी

‘मोठे पवार साहेब (शरद पवार) कधीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत. ते आजवर कधी रायगडावर देखील गेलेले नाहीत. तिथे कधी नतमस्तक झालेले नाहीत’, अशी टीका नितेश राणेंनी केलीये. याबद्दल अजित पवार यांना त्यांचं मत काय असं विचारण्यात आलं.

ADVERTISEMENT

त्यावर अजित पवारांनी हावभाव करत खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलं. विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “‘टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही… त्यांची उंची किती? त्यांची झेप किती? त्यांना मी कशाला उत्तर देऊ? माझे बाकीचे प्रवक्ते वैगरे देतील उत्तर… मी असल्यांच्या नादी लागत नसतो”, असं अजित पवार म्हणाले.

ADVERTISEMENT

नितेश राणेंनी अजित पवारांच्या विधानावर काय म्हटलंय?

अजित पवारांच्या या विधानानंतर आमदार नितेश राणेंनी ट्विट करत पलटवार केलाय. नितेश राणे म्हणतात, “लघुशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केलं यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची’ टीका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही”, असं म्हणत नितेश राणेंनी पुन्हा एकदा अजित पवारांना डिवचलंय.

नितेश राणेंनी ट्विट करताना ते अजित पवारांनाही टॅग केलंय. त्यामुळे अजित पवार काय उत्तर देणार हेही औत्सुक्याचं असणार आहे. मात्र, नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिल्यानं अजित पवार आणि राणेंमधील हा शाब्दिक वाद आणखी वाढणार असंच दिसतंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT