'ड्रग माफियांकडून वसुली का करता?' राम कदम यांचा ठाकरे सरकारला तिखट प्रश्न

भाजपचे आमदार राम कदम यांची ठाकरे सरकारवर टीका
'ड्रग माफियांकडून वसुली का करता?' राम कदम यांचा ठाकरे सरकारला तिखट प्रश्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री यांनी आज NCB च्या छाप्यावर टीका केली आणि त्यांनी भाजपलाही लक्ष्य केलं. त्यानंतर पत्रकार परिषद घेत NCB ने पुन्हा एकदा माहिती कशी मिळाली? काय कारवाई केली? ते सांगितलं तसंच जे आरोप केले जात आहेत ते तथ्यहीन आहेत असंही स्पष्ट केलं. यानंतर भाजप नेतेही सरकारवर टीका करत आहेत. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत कारवाई करणारे लोक NCB चे अधिकारी नसून भाजपचेच लोक आहेत असा आरोप केला. त्याला आता राम कदम यांनी उत्तर दिलं आहे.

'ड्रग माफियांकडून वसुली का करता?' राम कदम यांचा ठाकरे सरकारला तिखट प्रश्न
आर्यन खान करत होता 'या' अलिशान क्रूझमध्ये पार्टी

काय म्हणाले राम कदम?

NCB च्या अधिकाऱ्यांनी एवढ्या साहसाने कारवाई केली. काही लोकांना रंगेहात पकडलं. देशभरातून या कारवाईचं कौतुक होतं आहे. अशात राज्याचे एक मंत्री पत्रकार परिषद घेऊन ही कारवाईच ढोंग असल्याचं, बनाव असल्याचं सांगत आहेत. हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा अपमान आहे. जे अधिकारी कारवाई करतात ते ढोंगी आणि ड्रगमाफिया चांगले असं म्हणायचं आहे का? महाराष्ट्र सरकार ड्रगमाफियांकडून वसुली का करतं आहे? कोट्यवधींची वसुली ड्रग माफियांकडून होत असल्याने त्यांना समर्थन दिलं जातं आहे का? असाही प्रश्न राम कदम यांनी विचारला आहे. राजकारणात किती खालच्या पातळीवर जायचं यालाही मर्यादा आहेत असंही राम कदम म्हणाले तसंच ड्रग माफिया तीन पक्षांच्या सरकारचे घर जावई आहेत का? असाही प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक यांनी NCB आणि भाजपवर नेमके काय आरोप केले आहेत?

'राजीव गांधी यांच्या इच्छाशक्तीमुळे NDPS कायदा देशात लागू झाला. देश ड्रग्समुक्त व्हावा यासाठी NCB ची स्थापना करण्यात आली. यावेळी राज्यांसह केंद्रीय एजन्सीला देखील तपासाचे अधिकार देण्यात आले. गेल्या 36 वर्षापासून आतापर्यंत या तपास संस्थेने अनेक रॅकेट उघडकीस आणले आहेत. गेल्या 36 वर्षापर्यंत या एजन्सीच्या तपासावर कधीही शंका घेण्यात आली नाही. पण आता मात्र, NCB च्या तपास यंत्रणेवर सवाल उपस्थित केले जात आहेत.'

'सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण हे हत्या प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी असं चित्र निर्माण करण्यात आलं की, ड्रग्ससाठी त्याची हत्या झाली. तेव्हापासून NCB चं झोनल ऑफिस लाइमलाइटमध्ये आलं. त्यानंतर त्या प्रकरणात बातम्या प्लांट करण्यात आल्या आणि बॉलिवूडचं नाव खराब करण्यात आलं. अनेक कलाकारांना समन्स देऊन चौकशीसाठी बोलावण्यात आलं.' असं नवाब मलिक म्हणाले.

Related Stories

No stories found.