'२०१७ ला मुंबई तुंबली तर मुख्यमंत्री जबाबदार, २०२१ मध्ये पाऊस..असं कसं चालेल?' BJP चा शिवसेनेला बोचरा प्रश्न

भूस्खलन दुर्घटनेनंतर 'सामना'च्या माध्यमातून शिवसेनेने केली महापालिकेची पाठराखण
पावसामुळे रविवारी मुंबईत निर्माण झालेली परिस्थिती
पावसामुळे रविवारी मुंबईत निर्माण झालेली परिस्थितीफोटो सौजन्य - सचिन सावंत

शनिवारी मध्यरात्रीपासून मुंबईत पावसाने दमदार कमबॅक केलंय. या पावसाचा फटका अनेक सखल भागांना बसला. विविध ठिकाणी भूस्खलनाचे प्रकार घडून ३२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर सामना अग्रलेखातून शिवसेनेने महापालिकेची पाठराखण करत दुर्घटनेला अनैसर्गिक पाऊस जबाबदार असल्याचं म्हटलं. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनेला बोचरा प्रश्न विचारला आहे.

२०१७ मध्ये मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार होते, २०२१ ला मुंबई तुंबली तेव्हा पाऊस जबाबदार, असं कसं चालेल? असा प्रश्न विचारत लाड यांनी शिवसेनेला कोंडीत पकडलं आहे.

अग्रलेखातून शिवसेनेने कशा पद्धतीने केली आहे पाठराखण, जाणून घ्या...

मुंबईतली दुर्घटनांची दरड ही अनैसर्गिक पावसामुळे कोसळली. काहीही झालं की मुंबई महापालिकेच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं अशा शब्दांत शिवसेनेने टीकाकारांना उत्तर दिलंय. पावसाळ्यापूर्वी आणि प्रत्यक्ष मुसळधार पाऊस कोसळतो तेव्हा प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेतली जात असते. तरीही कधीकधी ‘अनैसर्गिक’ पावसाचा ‘दगाफटका’ होतो, असंही अग्रलेखात म्हटलंय.

पावसामुळे रविवारी मुंबईत निर्माण झालेली परिस्थिती
Landslide in Mumbai : …तरीही मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर ! भातखळकरांची बोचरी टीका

अग्रलेखामध्ये BMC ची पाठराखण करताना शिवसेनेने, "मुंबईतील जागेची अडचण आणि त्या तुलनेत असलेली मोठी लोकसंख्या यामुळे निवासाचा प्रश्न पूर्वांपार बिकट आहे. त्यातून मुंबई आणि उपनगरांमधील छोटे-मोठे डोंगरही सुटलेले नाहीत. निसरड्या डोंगरउतारांवर वसलेल्या या झोपडपट्ट्यांत हजारो कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहत आहेत. दर पावसाळ्यात त्या वस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो", असं म्हटलंय.

पावसामुळे रविवारी मुंबईत निर्माण झालेली परिस्थिती
अनैसर्गिक पावसामुळे मुंबईत Landslide, संजय राऊतांकडून BMC ची पाठराखण

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in