मुन्ना यादव यांचं नवाब मलिकांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मी गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपचा कार्यकर्ता आहे. आज नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले कारण त्यांना माहित आहे की मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामुळे ते घाबरून हे आरोप केले आहेत असं मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

नवाब मलिक यांनी माझ्यावर केलेले सगळे आरोप खोटे आहेत. नवाब मलिकांना माहित आहे की संजय राठोड यांनी काय केलं. अनिल देशमुख का तुरुंगात आहे याचंही कारण त्यांना माहित आहे त्यामुळेच ते आता असे आरोप करत आहेत. माझ्यावर कोणतेही गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत. माझे अंडरवर्ल्ड सोबत संबंध नाहीत. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध सिद्ध होणार आहेत त्यामुळे त्यांचं धाबं दणाणलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी हायड्रोजन बॉम्ब टाकणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र आज जो बॉम्ब मलिक यांनी टाकला त्यात कोणताही दम नाही असंही मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुन्ना यादव यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्याच्या कामगार मंडळाचं अध्यक्ष का केलं? मी मलिक यांना सांगू इच्छितो, मी आता नवाब मलिकांच्या विरोधात मानहानीचा दावा करणार आहे. नवाब मलिक यांची चौकशी सुरू होणार, त्यांच्यावरचे आरोप सिद्ध होणार आहेत. माझी आत्तापर्यंत अनेकदा चौकशी झाली आहे. मी आताही कोणत्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडून देईन पण सिद्ध झाले नाहीत तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा असं आव्हानच मुन्ना यादव यांनी नवाब मलिकांना दिलं आहे.

माझ्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यासोबत भांडण झालं. त्यामुळे माझ्यावर राजकीय गुन्हा दाखल आहे. मात्र मला नवाब मलिक यांनी आज कुख्यात गुंड म्हटलं त्यामुळे मी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा करणार आहे. नवाब मलिक यांची औकात फक्त एक रूपयाची आहे त्यामुळे मी त्यांच्याविरोधात एक रूपयाचा मानहानीचा दावा करणार आहे असंही मुन्ना यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

ADVERTISEMENT

माझ्या नावाचं भांडवल केलं जातं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यासाठी माझ्या नावाचा वापर केला गेला आहे. माझ्यावर नवाब मलिक यांनी केलेला आरोप खोटा आहे. मी त्यांना मानहानीचा दावा करून उत्तर देणार आहे असंही मुन्ना यादव यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

मलिक विरुद्ध फडणवीस : ‘त्यांचं एकच लक्ष्य आहे’; अमृता फडणवीसांचा नवाब मलिकांवर ‘ट्वीट’ हल्ला

नवाब मलिक यांनी नेमके काय-काय आरोप केले.

‘देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना, गुन्हेगारांना शासकीय आयोग, बोर्डाच्या अध्यक्षपदी जागा दिली. मुन्ना यादव नावचा एक व्यक्ती जो नागपूरमधील नामचीन गुंड आहे ज्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. त्याला फडणवीसांनी कंस्ट्रक्शन बोर्डाचं अध्यक्ष बनवलं होतं’

मलिक पुढे म्हणाले की, हैदर आझम नावाचा आणखी एक व्यक्ती आहे ज्याला फडणवीसांनी फायनान्स कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवलं होतं. खरं तर तो बांग्लादेशातून येणाऱ्या लोकांना मुंबई अनधिकृरित्या वसविण्याचं काम करतो. त्याची दुसरी पत्नी ही बांग्लादेशीच आहे. जिचा सध्या मालाड पोलिसांकडून तपास सुरु आहे. असं म्हटलं जात आहे की, जेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते तेव्हा सीएम ऑफिसमधून कॉल आला आणि त्यानंतर हे प्रकरणं दाबलं गेलं.’ असा आरोप मलिकांनी फडणवीसांवर केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT