Election साठी भाजपचा मराठी कट्टा! भाजप-शिवसेनेत पुन्हा नवं युद्ध पेटणार?

भाजप घेऊन येत असलेला मराठी कट्टा काय वाचा सविस्तर
Election साठी भाजपचा मराठी कट्टा! भाजप-शिवसेनेत पुन्हा नवं युद्ध पेटणार?

सध्या देशाच्या राजकारणात चर्चा सुरू आहे पंजाबची. पंजाब काँग्रेसमध्ये घडलेल्या घडामोडी कशा नाट्यमय आहेत ते देश पाहतो आहे. तसंच दुसरी चर्चा रंगली आहे ती उत्तर प्रदेश विधानसभांची. अशात महाराष्ट्रात भाजप सुरु करतंय मराठी कट्टा. आता हा निवडणूक प्रचारासाठीचाच एक भाग आहे. 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. याला मिनी विधानसभाच म्हटलं जातं आहे.

अशात आता मराठी कट्टा सुरू केल्याने भाजप आपल्याकडे मराठी मतं वळवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. 2017 मध्ये मुंबई महापालिकेची जी निवडणूक झाली ती शिवसेना आणि भाजपमधली रस्सीखेच होती. हे आपण पाहिलंच मात्र त्यावेळी युती असल्याने भाजपने दावा सोडला. आता परिस्थिती बदलली आहे.

Election साठी भाजपचा मराठी कट्टा! भाजप-शिवसेनेत पुन्हा नवं युद्ध पेटणार?
उद्धव ठाकरे यांचा भावी सहकारीचा पुनरुच्चार, म्हणाले येणारा काळच ठरवेल

मराठी कट्टा हा गिरगावपासून ते बोरीवली, दहीसरपर्यंतच्या मराठी माणसांचा कट्टा आहे अशी माहिती सुनील राणे यांनी दिली आहे. मराठी माणसाला जाणवणाऱ्या समस्या, मराठी माणसाला काय वाटतं, त्यांच्या मनात काय भावना आहेत हे या मराठी कट्ट्याद्वारे समजू शकणार आहे असंही राणे यांनी म्हटलं आहे. मुंबईत भाजपकडे मराठी आमदार बरेच आहेत. मुंबईत मराठी माणूस, मराठी टक्का हा महत्त्वाचा घटक आहे. विविध जाती, धर्म, समाज यामध्ये आपला पक्ष पुढे गेला पाहिजे ही प्रत्येक पक्षाची भावना आहे तशीच आमच्याही पक्षाची भावना आहे.

मुंबईत अनेक घडामोडी केंद्राच्या माध्यमातून घडतील. ते बदल होत असताना पूर्वीची आपली संस्कृती, इथला गिरणी कामगार, इथला मराठी माणूस या सगळ्यांशी कनेक्ट असला पाहिजे म्हणून हा मराठी कट्टा आहे असंही सुनील राणे यांनी म्हटलं आहे.

Election साठी भाजपचा मराठी कट्टा! भाजप-शिवसेनेत पुन्हा नवं युद्ध पेटणार?
हे लोक मराठी माणसालाच परप्रांतीय ठरवतील; पाटलांच्या 'त्या' विधानांवरून राऊतांनी सुनावलं

शिवसेनेचा जिलबी फाफडा कार्यक्रम होतो आहे आणि भाजप मराठी कट्टा करतं आहे याबाबत शिवसेनेच्या शीतल पाटील-म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की भाजपला मराठी माणसापर्यंत पोहचता आलेलं नाही म्हणून भाजप मराठी कट्टा करतं आहे. सुनील राणेंनी हे मान्य केलं आहे की मराठी माणसांना स्वतःकडे आकृष्ट करण्यासाठी ते हे कार्यक्रम करत आहेत. त्यामुळे हा मराठी कट्टा नाही तर मराठी माणसाची थट्टा आहे. शिवसेना, मुंबई आणि मराठी माणूस यांचं नातं काय आहे हे दाखवण्यासाठी शिवसेनेला कोणताही कार्यक्रम करण्याची गरज नाही. मराठी, माणूस, शिवसेना हे नातं अभेद्य आहे त्यामुळे अशा कार्यक्रमांनी आम्हाला काही फरक पडणार नाही.

छट पूजा असेल किंवा इतर कार्यक्रम असतील जे मुंबईत केले जातात. त्याचं कारण इथे असणारे त्या समाजाचे अल्पसंख्य लोक आहेत. आता भाजप जो कार्यक्रम घेतंय त्यावरून त्यांना मुंबईत मराठी माणूस अल्पसंख्य झालाय हे दाखवून द्यायचं आहे का? सुनील राणे यांनी भाजपच्या मराठी आमदारांची नावं घेतली. मात्र 2017 मध्ये जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा सर्वाधिक अमराठी नगरसेवक हे भाजपमधून आले होते याचा त्यांना विसर पडला आहे असंही शीतल पाटील यांनी म्हटलं आहे.

भाजपचं प्रेम, त्यांचा कट्टा हे सगळं भाजपचं पुतना मावशीचं प्रेम आहे. भाजयुमोला मराठी अध्यक्ष मिळत नाही. मंगलप्रभात लोढांना अध्यक्ष का केलं? कृपाशंकर सिंग यांना उपाध्यक्ष केलं गेलं आहे. ते कशासाठी? भाजप मराठी कट्टा कसा काय साजरा करतंय? असाही प्रश्न शीतल पाटील यांनी विचारला. आशिष शेलार हे भाजपचे मुंबई अध्यक्ष होते. ते साडेसहा वर्षे होते त्यानंतर मंगलप्रभात लोढांना आणलं. प्रत्येक विषय राजकीयच करायला पाहिजे असं नाही. विविध विषयांना वाचा फोडण्यासाठी जशी व्यासपीठं असतात. प्रत्येक गोष्ट राजकीय अंगाने घ्यायच्या नाहीत. गिरणी कामगारांचा विषय मराठी कट्टा म्हणून आणणार आहोत का तर नाही. सरकारं येतात, जातात.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे फोटो-इंडिया टुडे

मराठी कट्टा म्हणजे चर्चा आहेत, मुंबई बदलते आहे, देश बदलतो आहे. काही विचारवंत, साहित्यिक, लेखक, काही अशी मंडळी असतील त्यांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगायच्या असतील तर आम्ही तो कार्यक्रम राजकीय नाही असंही सुनील राणे यांनी म्हटलं आहे. यामधे मराठी टक्का भाजपकडे वळला पाहिजे. मराठी कट्टा या विषयाला सुरूवात होईल तेव्हा गोष्टी हळूहळू समोर येतीलच की..प्रत्येक गोष्टीचा अन्वयार्थ काढण्याची घाई करू नये असं सुनील राणे यांनी म्हटलं आहे.

भाजपचे एक तृतीयांश नगरसेवक हे अमराठी आहेत असंही शीतल पाटील म्हणाल्या. त्यामुळे भाजपचं पुतनामावशीचं प्रेम समोर येतं आहे. निवडणूक समोर आल्याने भाजप हे करतं आहे. मराठी कट्टा करण्यासाठी भाजप निवडणुकीच्या तोंडावरच पुढे का सरसावली आहे? मराठी माणसाला आधी नाकारायचं आणि मग निवडणूक जवळ आली की चुचकारायचं हे भाजपचं धोरण आहे असाही आरोप शीतल पाटील यांनी केला आहे.

मुंबई महापालिकेत शिवसेना हा क्रमांक एकचा पक्ष आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. त्यानंतर काँग्रेस, चौथा क्रमांक राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यानंतर इतर पक्ष. 1999 च्या आधीच्या कालावधीत दत्ता सामंत यांचा गिरणगावात बोलबाला होता. या सगळ्या गोष्टी बघत आम्ही मोठे झालो. सचिन अहिर यांच्यासोबत आम्हीच (भाजप-शिवसेना) लढा देत होतो. राजकारणात अनेक गोष्टी घडतात पण त्यामुळे पूर्वीची समीकरणं बदलत नाही.

करी रोड, चिंचपोकळी, लालबाग, दादर या ठिकाणी राहणारा मराठी वर्ग होता तो 1999 नंतर राष्ट्रवादीकडे गेला. पंधरा वर्षे फार मोठे विजय राष्ट्रवादीचे झाले नसतील. पण त्या भागात मतदान फिरत होतं. इतर भाषिकांच्या मतांचा फायदा भाजप-शिवसेना दोघांना होत होता. मराठी कट्टा हे एक नाव आहे. आम्ही कोणताही लपवालपवीचा कार्यक्रम करत नाही. राजकारण वैयक्तिक नसतं.. असं सुनील राणे यांनी म्हटलं आहे.

भाजपचा प्रवास हा चिंतन बैठकांकडून कट्ट्याकडे आला आहे. तो प्रयोग राजकीय आहे की नाही हे सुनील राणे सांगत नाहीत. मात्र एक विचार करणारा, विचार करून चर्चा करणारा पक्ष असं म्हणून भाजपकडे पाहिलं जातं. आत्ता जे सुरू आहे ते हास्यास्पद वाटतं आहे असंही शीतल पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावर पुन्हा एकदा सुनील राणे यांनी हेच उत्तर दिलं आहे की काय घडतंय काय कार्यक्रम आहे हे तुम्हाला कट्टा सुरू झाल्यावरच समजेल.

Election साठी भाजपचा मराठी कट्टा! भाजप-शिवसेनेत पुन्हा नवं युद्ध पेटणार?
Narayan Rane: शिवसेना भाजप-युतीचा निर्णय ठाकरे-फडणवीस दोघंच घेतील

शिवसेनेची सुरूवात कट्ट्यावरून झाली होती. आता भाजपने मराठी कट्टा आणला आहे. या मराठी कट्टा कार्यक्रमात काय काय गोष्टी घडणार आणि या मराठी कट्ट्यामुळे भाजपचा मतदानाचा टक्का वाढणार का आणि मराठी मतदार वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in