'काँग्रेसचे खुनी इरादे फसले', PM मोदींच्या सुरक्षेबाबत झालेल्या चुकीनंतर स्मृती इराणी संतापल्या

bloody intentions of congress failed smriti irani angry on the lapse in pm modis security
bloody intentions of congress failed smriti irani angry on the lapse in pm modis security(फोटो सौजन्य: Twitter)

नवी दिल्ली: पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून भाजप आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पवित्र भूमीवर काँग्रेसचे 'खुनी इरादे' फसले आहेत. काँग्रेसमधील जे लोकं पंतप्रधानांचा तिरस्कार करतात आज ते त्यांच्या सुरक्षेला तडा देण्याचा प्रयत्न करत होते.

दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांना संबोधित करताना स्मृती इराणी यांनी पंजाबमधील काँग्रेस सरकारला पूर्णपणे अपयशी ठरवले. तसेच पंजाब पोलीस हे माहीत असूनही त्यांनी फक्त मूकदर्शकाची भूमिका बजावत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाला जाणूनबुजून खोटं सांगण्यात आलं का? असा सवाल भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना पंतप्रधानांच्या गाडीपर्यंत कोणी आणि कसे आणले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

पीएम मोदींच्या सुरक्षेत चूक की षडयंत्र?

त्याचवेळी, राज्यसभा खासदार आणि भाजपचे प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, 'आज अशी घटना घडली आहे, जी भारताच्या इतिहासात अभूतपूर्व आहे. दहशतवादाच्या काळात किंवा दहशतवादग्रस्त भागातही अशाप्रकारे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत चूक झाली नसेल अशी चूक आज पंजाबमध्ये झाली आहे.'

काय आहे संपूर्ण प्रकरण

आज (5 जानेवारी) पीएम मोदी पंजाबच्या भटिंडा येथे पोहोचले. येथून त्यांना हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जायचे होते. पण अपुरा प्रकाश आणि पावसामुळे पीएम मोदी यांना तब्बल 20 मिनिटं वाट पाहावी लागली. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला.

या मार्गाने त्यांना तब्बल 2 तास लागणार होते. पंजाब डीजीपीकडून सुरक्षा व्यवस्थेची पुष्टी केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे रस्त्याने निघाले.

आंदोलकांनी केला रास्ता रोको

पंतप्रधान मोदींचा ताफा हा राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापूर्वी सुमारे 30 किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी इथे रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला उड्डाणपुलावर 15 ते 20 मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.

bloody intentions of congress failed smriti irani angry on the lapse in pm modis security
विमानतळापर्यंत जिवंत पोहचलो, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना आभार सांगा; मोदींनी सुनावलं

जेपी नड्डा यांनीही केला हल्लाबोल

याशिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकाराबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, 'आगामी विधानसभा निवडणुकीत लोकांच्या हातून दारूण पराभवाच्या भीतीने पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंतप्रधान मोदींचे पंजाबमधील कार्यक्रम उधळून लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा अक्षरश: खेळखंडोबा करण्यात आला.' अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in