Crime : ब्रेकअपमधून झालेल्या वादातून मैत्रिणीला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील घटना
Crime : ब्रेकअपमधून झालेल्या वादातून मैत्रिणीला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी
छायाचित्र प्रातिनिधीक आहे

ब्रेकअपमधून झालेल्या वादातून आपल्याच मैत्रिणीला बंदूक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घडला आहे. विक्की चकोले असं या तरुणाचं नाव असून त्याच्याकडे बंदूक कशी आली याचा शोध घेण्याची मागणी होते आहे.

प्रीती झोडे असं विद्यार्थीनीचे नाव असून ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील पॅरामेडिकलची विद्यार्थ्यांनी आहे आणि तिच्यावर विक्की चकोले या युवकाने चक्क बंदूक रोखली. या प्रकरणी अजनी पोलिस ठाण्यात कलम ३०७ नुसार खूनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला असून फरार विक्कीच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आल्याची माहिती अजनीचे ठाणेदार विजय तलवारे यांनी मुंबई तक ला दिली.

चार महिन्यांपूर्वी प्रिती आणि विक्की यांची ओळख झाली होती. यानंतर दोघांमधल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही कालवधीनंतर या दोघांचं ब्रेकअपही झालं. खूपदा भेटायचा प्रयत्न करूनही प्रीती विक्कीला भेटत नव्हती. सोमवारी प्रिती लायब्ररीजवळ असताना विक्कीने तिला गाठून आपल्याशी बोलत का नाहीस असं विचारलं. यानंतर दोघांमध्ये पुन्हा वादाला सुरुवात झाली. या वादातून विक्कीने आपल्याजवळ असणारी अग्नीशस्त्रासरखं शस्त्र दाखवून प्रितीला जिवे मारण्याची धकमी दिली.

परंतू या शस्त्रातून कोणतंही फायरिंग झालं नाही अशी माहिती पोलिसांनी दिली. थोड्यावेळाने आरोपी विक्की घटनास्थळावरुन फरार झाला. यानंतर प्रितीने घडलेल्या प्रकाराबद्दल विक्कीविरोधात अजनी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in