'माझ्या एका खिशात ब्राह्मण, दुसऱ्या खिशात बनिया' भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

'माझ्या एका खिशात ब्राह्मण, दुसऱ्या खिशात बनिया' भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

मध्य प्रदेश भाजपचे राज्य प्रभारी पी. मुरलीधरराव यांनी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ब्राह्मण आणि बनिया अर्थात वाणी समाजाबाबत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ज्यानंतर त्यांच्यावर टीका होण्यास सुरूवात झाली. या टीकेनंतर स्पष्टीकरण देत पी. मुरलीधर राव यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप हा एकेकाळी ब्राह्मण, वाण्यांचा पक्ष होता. तर कधी एससी, एसटी, ओबीसींचा पक्ष असे का? मुरलीधर राव यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. तसंच विकासाच्या गप्पा मारतो, मात्र जातीच्या नावावर मतं का मागितली जातात असाही प्रश्न यावेळी विचारला गेला होता. त्यावर मुरलीधर राव म्हणाले की 'माझ्या एका खिशात ब्राह्मण तर एका खिशात बनिया आहेत. आता प्रश्न विचारला आहे तर ऐका. माझ्या व्होट बँकेत माझ्या कार्यकर्त्यांमध्ये, माझ्या नेत्यांमध्ये ब्राह्मण आहेत. त्यामुळे ब्राह्मणांचा पक्ष म्हटलं गेलं. वाणी आहेत म्हणून वाण्यांचा पक्ष म्हटलं गेलं. पक्ष सगळ्यांसाठी सुरू केला होता. पण त्यावेळी काही विशिष्ट वर्गातील लोक जास्त होते. त्यामुळे तुम्ही म्हणत आहात की हा पक्ष त्यांचा आहे. आपण सर्वांनीच पक्ष बनवण्याचं काम करतो आहोत'

कमलनाथ यांनी काय म्हटलं आहे?

हे भाजपाचे मध्य प्रदेशचे प्रभारी मुरलीधर राव आहेत, जे म्हणत आहेत की माझ्या खिशात ब्राह्मण आणि एका खिशात बनिया’ त्या वर्गाचा हा काय आदर आहे? याच प्रभारींनी यापूर्वी भाजपाच्या चार-पाच वेळा खासदार-आमदारांना अपात्र म्हटले आहे. त्यांच्या माजी नेत्याने क्षत्रिय समाजाचा अपमान केला आहे. त्यांनी या दोन्ही समाजांची माफी मागावी अशी मागणी कमलनाथ यांनी केली आहे.

या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर पी मुरलीधर राव यांनी संध्याकाळी स्पष्टीकरण दिले. 'आमचा पक्ष हा सर्व वर्गातील ब्राह्मण आणि वाण्यांचा पक्ष आहे. आमच्यासाठी वाणी आणि ब्राह्मण यांच्यात फरक नाही. भाजपा सर्वांना बरोबर घेऊन चालली आहे' असे मुरलीधर राव यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in