Crime: किराणा दुकान आणि घरात सापडला शस्त्र साठा, हजारो रुपयांचा गुटखा आणि दारूही जप्त

Buldhana Crime: बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात पोलिसांनी केलेल्या कारवाईत हजारो रुपयांचा गुटखा आणि दारु जप्त केली आहे. तसेच काही शस्त्र देखील पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
buldhana crime weapons found in grocery store and house gutka worth thousands of rupees and liquor also seize
buldhana crime weapons found in grocery store and house gutka worth thousands of rupees and liquor also seize

ज़का खान, बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री नांदुरा तालुक्यातील तिकोडी येथे देशी-विदेशी दारू, शस्त्र व मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त करुन एका आरोपीला अटक केली आहे. अपर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या पथकाला मिळालेल्या गुप्त महितीच्या आधारे ही कारवाई करण्याती आली.

नांदुरा तालुक्यातील ग्राम तिकोडी येथे एक व्यक्ती अवैधरित्या विनापरवाना शस्त्र तसेच देशी-विदेशी दारू व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पथकाने तिकोडी येथे असणाऱ्या राजू बडे यांच्या जगदंबा किराणा दुकान व घरावर धाड टाकली.

यावेळी पोलिसांना आरोपीच्या दुकानात आणि घरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तसेच मानवी आरोग्यास अपायकारक असलेला 23 हजार 760 रुपये किंमतीचा गुटखा तसेच 13 हजार 190 रुपये किंमतीची देशी-विदेशी दारू आढळून आली.

buldhana crime weapons found in grocery store and house gutka worth thousands of rupees and liquor also seize
5 कोटी रूपये किंमतीच्या 31 अलिशान कार चोरणाऱ्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी छाप्यात जप्त केलेली हत्यारं
पोलिसांनी छाप्यात जप्त केलेली हत्यारं

एवढंच नव्हे तर आरोपीच्या घरातून तलवार आणि एक मोठा चाकू देखील पोलिसांनी हस्तगत केला आहे. तसेच काही रोख रक्कमही आढळून आली. यावेळी पोलिसांनी एकूण 45 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या संपूर्ण कारवाईनंतर आरोपी राजू बडे याच्याविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

33 लाखांचा गुटखा जप्त, शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाविरोधात गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यातील केज उपविभागाचे आयपीएस अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील नांदूरघाट आणि बीड तालुक्यातील इमामपूर रोडवरील गोडाउनवर धाड टाकून गुटखा माफियांविरुद्ध कठोर कार्यवाही करीत 33 लाख 81 हजार रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला होता. याच प्रकरणी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर देखील गुन्हा देखील दाखल झाला होता.

buldhana crime weapons found in grocery store and house gutka worth thousands of rupees and liquor also seize
'या' मंत्र्याने वेष बदलून शहरात केली छापेमारी, पाहा त्यांच्या जाळ्यात कोण-कोण सापडलं

या कारवाईत नांदूरघाट येथे रामहिरी जाधव याच्या दुकानात ठेवलेला 1 लाख 57 हजार 265 रुपयांचा मुद्देमालासह रामहरी जाधव याला ताब्यात घेण्यात आलं होतं. पोलीस हवालदार बाबासाहेब बांगर यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात 328, 272 आणि 273 कलमप्रमाणे रामहरी वैजेनाथ जाधव (रा. नांदूरघाट) नवसेकर (रा. चौसाळा ता. जि.बीड ) बालाजी पान मटेरियलचा दुकान मालक (रा. कळंब जि. उस्मानाबाद) यांच्याविरुध्द केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in