Bulli Bai App case: मुस्लिम महिलांच्या अपमानाचं नेपाळ कनेक्शन, या सीक्रेट 'फ्रेंड'च्या संपर्कात होती श्वेता

Bulli Bai App case Shweta Singh secre friend: बुली बाई अॅप प्रकरणात आता श्वेता सिंह ही महिला नेपाळमधील एका व्यक्तीच्या इशाऱ्यावरुन काम करत असल्याचं समोर आलं आहे.
Bulli Bai App case: मुस्लिम महिलांच्या अपमानाचं नेपाळ कनेक्शन, या सीक्रेट 'फ्रेंड'च्या संपर्कात होती श्वेता
bulli bai app case shweta was in touch with secret friend of nepal connection of insulting muslim women(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: तब्बल 100 मुस्लिम महिलांबाबत ऑनलाइन आक्षेपार्ह मजकूर टाकून त्यांची बदनामी करणाऱ्या Bulli Bai प्रकरणात मुंबई पोलिसांनी एका 18 वर्षीय तरुणीला अटक केली आहे. याप्रकरणी आता एक महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगी श्वेता सिंह ही नेपाळमधील एका सोशल मीडिया मित्राच्या इशाऱ्यांवर काम करत होती.

तपास एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की, आरोपी श्वेता सिंहकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीवरून असे दिसून आले आहे की जियाउ नावाचा नेपाळी नागरिक हा श्वेताला Bulli Bai अॅपबाबत सूचना देत होता. श्वेता सिंह हिला उधमसिंग नगर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आणि त्यानंतर मुंबई पोलीस अधिकाऱ्यांनी 5 जानेवारीपर्यंत ट्रान्झिट रिमांडची मागणी केली.

श्वेता सिंहच्या नावाचा खुलासा हा आरोपी विशाल कुमार याने केला होता. त्याला बंगळुरुमध्ये अटक करण्यात आली होती. जो इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. विशाल कुमारने अशी माहिती दिली होती की, तो श्वेता सिंहच्या संपर्कात होता आणि श्वेता सिंह ही Bulli Bai App वर पोस्टवर काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात होती.

Vishal-Sulli Deals कनेक्शन

Bulli Bai अॅपच्या आधी 2021 मध्ये उघडकीस आलेल्या सुल्ली डील्स घटनेतील विशालच्या भूमिकेची मुंबई पोलिस अधिकारी देखील चौकशी करत आहेत. इंजिनीअरिंगचा सरासरी विद्यार्थी असलेल्या विशालची भूमिका ही विशिष्ट समुदायातील महिलांचे फोटो एडिट करुन ती अॅपवर अपलोड करण्याची होती.

श्वेता बनावट ट्विटर अकाउंटने चालवत होती JattKhalsa07

श्वेता सिंह JattKhalsa07 नावाचे बनावट ट्विटर हँडल वापरत होती ज्याचा वापर द्वेषपूर्ण पोस्ट, आक्षेपार्ह चित्रे आणि टिप्पण्या अपलोड करण्यासाठी केला जात होता.

कोण आहे श्वेता?

श्वेता सिंहला उत्तराखंडमधील उधम सिंह नगर येथून अटक करण्यात आली आहे. तिचा वडिलांचा कोरोनाच्या काळात मृत्यू झाला होता, तर आईचा कर्करोगाने मृत्यू झालेला. तिला एक मोठी बहीण आहे. तर एक लहान बहीण आणि भाऊ शाळेत आहेत. श्वेता इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.

पोलीस आता कथित नेपाळी नागरिक आणि श्वेता सिंहशी संबंधित इतरांच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. Bulli Bai अॅप हे श्वेता सिंहने स्वत: तयार केले होते की तिला अन्य कोणी मदत केली होती, याचाही तपास सुरू आहे. श्वेताला आज (5 जानेवारी) मुंबईत आणण्यात येणार असून तिला वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात रिमांडसाठी हजर केले जाणार आहे.

bulli bai app case shweta was in touch with secret friend of nepal connection of insulting muslim women
Bulli Bai app ची मास्टरमाईंड निघाली 'या' राज्यातील महिला, नेमकं प्रकरण काय?

उत्तराखंडच्या उधमसिंहनगरच्या एसपी सिटी ममता वोहरा यांनी मंगळवारी सांगितले की, मुंबई पोलिसांनी आदर्श कॉलनीतून एका महिलेला अटक केली आहे. जिच्यावर मुंबईत वादग्रस्त अॅप चालवल्याचा आरोप आहे. ज्याबाबत तरुणीने देखील या प्रकरणाची कबुली दिली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in