Bulli Bai App : मास्टरमाईंड असलेल्या 18 वर्षांच्या तरूणीला माफ करा, जावेद अख्तर यांचं ट्विट चर्चेत

वाचा सविस्तर काय म्हणाले जावेद अख्तर?
Bulli Bai App : मास्टरमाईंड असलेल्या 18 वर्षांच्या तरूणीला माफ करा, जावेद अख्तर यांचं ट्विट चर्चेत

Bulli Bai App च्या माध्यमातून मुस्लिम महिलांची बदनामी केल्या प्रकरणी मुंबई सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनीही यासंदर्भातली माहिती दिली. या प्रकरणी आता लेखक, गीतकार जावेद अख्तर यांचं ट्विट चर्चेत आलं आहे.

Bulli Bai App : मास्टरमाईंड असलेल्या 18 वर्षांच्या तरूणीला माफ करा, जावेद अख्तर यांचं ट्विट चर्चेत
Bulli Bai प्रकरणात तिघांवर कशी झाली कारवाई? कसा लागला छडा? पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी दिलं उत्तर

काय आहे जावेद अख्तर यांचं ट्विट?

जर Bulli Bai या App च्या मागे 18 वर्षांची मुलगी ही जर खरंच या प्रकरणी मास्टरमाईंड असेल आणि तिने कॅन्सर आणि कोरोनामुळे तिने पालक गमावले असतील तर महिला आणि इतर ज्येष्ठांनी तिची भेट घेतली पाहिजे आणि तिला माफ केलं पाहिजे. तिला दया दाखवत माफ केलं पाहिजे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. Bulli Bai App प्रकरणात जावेद अख्तर यांनी केलेलं हे ट्विट चर्चेत आहे.

कोण आहे आरोपी श्वेता सिंग?

ती उत्तराखंडची रहिवासी असून ती या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे सांगण्यात येत आहे. श्वेताने बुली बाई अॅपवर काही विशिष्ट समुदायातील महिलांचे फोटो अपलोड केले होते. तसेच त्यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह टिप्पणी देखील केली होती. धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं करणाऱ्या श्वेताचे वय अवघे 18 वर्षे आहे. मुंबई पोलिसांनी तिला उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातून अटक केली आहे.

श्वेताचे आई-वडील या दोघांचंही निधन झालं आहे. गेल्या वर्षी तिच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं होतं, तर त्याआधी तिची आई कर्करोगाने मृत्यू पावली होती. श्वेताला तिला एक मोठी बहीण आहे जी वाणिज्य शाखेत पदवीधर आहे. तर एक लहान बहीण आणि भाऊ देखील आहे. जे सध्या शाळेत शिकत आहेत. श्वेता स्वतः इंजिनीअरिंगच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती.

Bulli Bai App : मास्टरमाईंड असलेल्या 18 वर्षांच्या तरूणीला माफ करा, जावेद अख्तर यांचं ट्विट चर्चेत
Bulli Bai app ची मास्टरमाईंड निघाली 'या' राज्यातील महिला, नेमकं प्रकरण काय?

या अॅपमध्ये काय आहे?

Bulli Bai नावाच्या अॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. अॅपवर त्यांच्याविरोधात घृणास्पद आणि घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक, सुल्ली डील अॅपच्या धर्तीवरच बुली बाई अॅपवर काम केलं जात होतं. Sulli deal हे Github लाँच झालं होतं. तर बुली बाई देखील Github वरच लाँच झालेलं.

पीडित महिलांचं काय म्हणणं?

Bulli Bai Appच्या पीडितांपैकी एका महिलेने ट्विट केलं होतं की, 'मी अद्याप येथे माझा फोटो पाहिला नाही. पण या यादीत माझेही नाव आहे. हे सर्व आपल्याला सहन करावे लागत आहे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. मी ही यादी शेअर करत नाही कारण अशा अनेक महिला आहेत ज्यांना ती सार्वजनिक करायला आवडणार नाही.'

आणखी एका महिलेने लिहिले की, 'मी कायदेशीररित्या याचा पाठपुरावा करत आहे. मुस्लिम महिलांना वारंवार टार्गेट करणे, आमचा अपमान करणे हे अत्यंत लज्जास्पद आणि भयंकर आहे. अशा गुन्हेगारी वर्तनाला माफ करता येणार नाही.'

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in