Bullibai App Case : आरोपी श्वेता सिंग आणि मयांक रावत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Bullibai App Case : आरोपी श्वेता सिंग आणि मयांक रावत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Bullibai App प्रकरणातील आरोपी श्वेता सिंग आणि मयांक रावत या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बांद्रा मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने हा निर्णय दिला आहे. या दोघांनाही उत्तराखंडहून अटक करण्यात आली होती. विशाल कुमारच्या अटकेनंतर ही कारवाई करण्यात आली. विशाल कुमारची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली त्यामुळे त्यालाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

शुक्रवारी मयांक रावतचीही कोव्हिड चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली आहे. तसंच सायबर खात्याच्या अधिकाऱ्यांनी हे सांगितलं की या दोघांच्या कोठडीची आणखी आवश्यकता आम्हाला नाही. अधिकाऱ्यांनी न्यायालयाला हे देखील सांगितलं की विशाल कुमारला अटक केल्यानंतर या प्रकरणातील प्रमुख आरोपी नीरज बिश्नोई याने श्वेता सिंग आणि मयांक रावत यांना याबाबत माहिती दिली होती. ज्यानंतर या दोघांनी त्यांचं सोशल मीडिया अकाऊंट डिलिट केलं होतं.

Bullibai App Case : आरोपी श्वेता सिंग आणि मयांक रावत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Bulli Bai App : मास्टरमाईंड असलेल्या 18 वर्षांच्या तरूणीला माफ करा, जावेद अख्तर यांचं ट्विट चर्चेत

श्वेता सिंगचे वकील चितरंजन दास यांनी कोर्टाला सांगितलं की श्वेता आठ दिवसांपासून पोलीस कोठडीत होती तिला आणखी कोठडीची आवश्यका नाही. सायबर क्राईमच्या अधिकाऱ्यांनी श्वेताला थोबाडीत मारली असाही दावा त्यांनी केला. ज्यानंतर कोर्टाने श्वेताला यासंदर्भात विचारलं की तिला काही वेदना होत आहे का? मात्र निरीक्षणात असं नोंदवण्यात आलं की तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. या प्रकरणी डीसीपी सायबर क्राई यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.

(प्रातिनिधिक फोटो)

Bulli Bai app अॅप नेमकं काय आहे

काही दिवसांपूर्वी Bulli Bai नावाचे एक अॅप तयार करण्यात आले होते. त्या अॅपवर मुस्लिम महिलांना टार्गेट केले जात होते. त्यांच्या विरोधात द्वेष पसरवला जात होता. एवढंच नव्हे तर अत्यंत त्यांच्यासंबंधी घाणेरड्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. वास्तविक हे अॅप त्याच पद्धतीने बनविण्यात आले होते जसे Sulli deal तयार करण्यात आले होते. GitHub वर Sulli deal लाँच करण्यात आलं होतं. आता Bulli Bai app देखील GitHub वर लॉन्च करण्यात आलं होतं.

Bullibai App Case : आरोपी श्वेता सिंग आणि मयांक रावत यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
वडिलांना कोरोना, तर आईला कर्करोगामुळे गमावलं; कोण आहे Bulli Bai अ‍ॅपची मास्टरमाइंड श्वेता?

शंभर महिलांना केलं गेलं टार्गेट

ट्विटर आणि फेसबुकवर दमदारपणे देशातील परिस्थितीबाबत आपली परखड मतं मांडणाऱ्या शेकडो महिलांना Bulli Bai app वर टार्गेट करण्यात आले आहे. या पीडितांमध्ये मीडियासह इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे. त्या निकृष्ट अॅप आणि प्लॅटफॉर्मवर त्यांची नावे आणि फोटो वापरण्यात येत असल्याची तक्रार या सर्व महिलांनी केली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या अ‍ॅपच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी एका महिला पत्रकाराच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in