'मला दाऊद म्हणून संबोधू नका' ज्ञानदेव वानखेडेंतर्फे कोर्टात युक्तीवाद, वाचा आज काय घडलं?

'मला दाऊद म्हणून संबोधू नका' ज्ञानदेव वानखेडेंतर्फे कोर्टात युक्तीवाद, वाचा आज काय घडलं?

नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडेंवर आणि समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांचं प्रकरण बॉम्बे हायकोर्टात पोहजलं आहे. ज्ञानदेव वानखेडे यांचं म्हणणं हे आहे की मी जन्माने हिंदूच आहे. मी कधीही मुस्लिम धर्म स्वीकारला नाही मग माझा मुलगा समीर मुस्लिम कसा? दुसरीकडे नवाब मलिक यांनी हा दावा केला आहे की ज्ञानदेव वानखेडे यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. समीर वानखेडे हेदेखील मुस्लिम आहेत. त्यांनी एससी असल्याची खोटी कागदपत्रं सादर करून सरकारी नोकरी मिळवली. आता या सगळ्या प्रकरणाचा निकाल सोमवारी म्हणजेच 22 नोव्हेंबरला लागणार आहे.

न्यायमूर्ती माधव जमादार यांनी आपला निकाल राखून ठेवला आहे. नवाब मलिक आणि ज्ञानदेव वानखेडे दोघांकडूनंही अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी हायकोर्टाकडे परवानगी मागण्यात आली होती. हायकोर्टाने ही विनंती मान्य केली. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला, दाखल्याचा फॉर्म आणि नाव बदलल्याचा दाखला कोर्टात सादर केला. तर ज्ञानदेव वानखेडे यांनी आपलं जातीचं प्रमाणपत्र आणि समीर वानखेडेंचा जन्म दाखला कोर्टात सादर केला. अंतिम निकाल जाहीर होण्यापूर्वी ही कागदपत्रं दोन्ही बाजूंनी दाखल झाल्यामुळे सोमवारी हायकोर्ट काय निकाल देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान ज्ञानदेव वानखेडे यांच्या वकिलांतर्फे कोर्टात ही विनंती करण्यात आली की आता दाऊद असं संबोधून आमची बदनामी करू नका.

'मला दाऊद म्हणून संबोधू नका' ज्ञानदेव वानखेडेंतर्फे कोर्टात युक्तीवाद, वाचा आज काय घडलं?
'माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम' नवाब मलिक यांच्या आरोपांवर समीर वानखेडेंचं उत्तर

ज्ञानदेव वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात हायकोर्टात सुरू असलेल्या खटल्यात वानखेडेंच्या जातीबाबत खुलास करत नवाब मलिकांना नव्यानं प्रतिज्ञापत्र कोर्टापुढे सादर करायचं होतं. मात्र हायकोर्टातील याप्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलेला असल्यानं आता पुन्हा नव्यानं यात काही दाखल करायचं असल्यास त्यांना कोर्टाची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक होतं. त्याच परवानगीसाठी गुरूवारी नवाब मलिकांच्यावतीनं कोर्टाकडे विनंती केली गेली जी कोर्टानं मान्य केली. यावेळी वानखेडेांच्यावतीनंही एक प्रतिज्ञापत्र यासंदर्भातील काही पुरावे कोर्टात सादर केले गेले.

'मला दाऊद म्हणून संबोधू नका' ज्ञानदेव वानखेडेंतर्फे कोर्टात युक्तीवाद, वाचा आज काय घडलं?
राज्यपाल कोश्यारींनी वानखेडे कुटुंबाला काय आश्वासन दिलं?

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिकांविरोधात सव्वा कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. मलिकांनी आपला 'दाऊद' असा केलेला उल्लेख आणि समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा केलेला दावा चुकीचा आहे. तसेच नवाब मलिकांनी एकापाठोपाठ एक आरोप करत संपूर्ण वानखेडे कुटुंबीयांची सुरू केलेली बदनामी तातडीने थांबवण्याची मागणीही या याचिकेतून करण्यात आली आहे.

दरम्यान आपला आदेश राखून ठेवल्यानंतर, न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना दाखल करायची असलेली काही अतिरिक्त कागदपत्रे घेण्याचा निर्णय घेतला. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर कोर्ट सुनावणी करत होते.

वानखेडेचे वकील अर्शद शेख आणि दिवाकर राय यांनीही न्यायालयाला दोन कागदपत्रे दिली. बीएमसीने जारी केलेले डिजिटल जन्म प्रमाणपत्र आणि वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांचे जात प्रमाणपत्र अशी कागदपत्रं कोर्टासमोर सादर करण्यात आली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in